घरताज्या घडामोडीएकनाथ शिंदेंच्या गटात अजून एका आमदाराचा समावेश, मुंबई व्हाया गुवाहाटीकडे रवाना

एकनाथ शिंदेंच्या गटात अजून एका आमदाराचा समावेश, मुंबई व्हाया गुवाहाटीकडे रवाना

Subscribe

मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले असून त्यांच्यासोबत ४६आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. महाविकास आघाडी सरकार बरखास्त होऊ असतानाच काही अपक्ष आमदार सुद्धा मोठी भूमिका घेत असल्याचं सांगितलं जात आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे तातडीने मुंबईला रवाना झाले होते. परंतु ते आता गुवाहटीला जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या गटात अजून एका आमदाराचा समावेश झाला आहे.

अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा जळगाव विमानतळावरील फोटो मिळाला आहे. चंद्रकांत पाटील यांनी जळगाव विमानतळावर खासगी विमान बोलावले. नंतर या विमानाने ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र, मुंबई व्हाया ते गुवाहाटीकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच त्यांच्यासोबत काही शिवसेना कार्यकर्ते देखील असल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यातील तीन सेनेचे आमदार यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्यासोबत फुटले आहेत. यामध्ये आमदार किशोर पाटील, पोराळे येथील आमदार चिमणराव पाटील, चोपड्याचे आमदार लताबाई सोनवणे यांचा समावेश आहे.

दोन आमदार परतले…

शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आणि अपक्ष आमदार नितीन देशमुख हे उद्धव ठाकरेंचे समर्थक असल्यामुळे त्यांनी पळ काढला आहे. मला हार्टअॅटक आल्याचा बनाव रचण्यात आला. मला रुग्णालयात नेल्यानंतर २०-२५ जणांनी मला पकडून बळजबरीने इंजेक्शन टोचले गेले, असा गौप्यस्फोट देशमुखांनी केला आहे. तर काल उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी आपली सुटका कशा पद्धतीने झाली, याचा थरारक प्रसंग मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : महाविकास आघाडी सरकारचं काऊंटडाऊन सुरू, मुख्यमंत्री बरखास्तीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -