घरताज्या घडामोडीनेत्यांनो भांडा, पण ट्विट डिलिट करणाऱ्या आदित्य ठाकरेंचे नाक कापू नका, भाजपचा...

नेत्यांनो भांडा, पण ट्विट डिलिट करणाऱ्या आदित्य ठाकरेंचे नाक कापू नका, भाजपचा टोमणा

Subscribe

लसीकरणाचे राजकारण

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लसीकरणासाची मोहिम हाती घेतली आहे. येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. राज्य सरकारमध्ये १८ वर्षांवरील ते ४५ वर्षांपर्यंतच्या नागरिकांचे मोफत कोरोना लसीकरण करण्यावरुन श्रेयवादावरुन मतभेद असल्याचे दिसते आहे. यावरुन भाजप उपप्रदेशाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. लसीकरणाच्या श्रेयवादावरुन भांडा पण जनतेसाठी ट्विट डिलीट करणाऱ्या आदित्य ठाकरेंचे नाक कापू नका असा टोमणा आमदार प्रसाद लाड यांनी लगावला आहे.

राज्यात मोफत कोरोना लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले होते तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परवडतं त्यांच्याकडून पैसे असे म्हटले होते तर काँग्रेसचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे श्रेय लाटू नका असे म्हटले आहे यावरुन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीवर खोचक टीका केली आहे. महाविकास आघाडीमध्ये कोरोना लसीकरण आणि श्रेयवादावरुन लढाई झाल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.

- Advertisement -

लसीकरणावरुन महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये फार मोठा कागिलतुरा चालु आहे. राजेश टोपे म्हणतात ज्यांना परवडत नाहीत त्यांनाच आम्ही मोफत लस देऊ नवाब मलिक म्हणतात सर्वांना मोफत लस देऊ महसूलमंत्री बाळासाहेब म्हणतात आम्ही श्रेय घेऊ ह्या पद्दतीने प्रत्येकजण श्रेयवाद आणि कोरोना लसीसाठी जर वाद करत असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेसाठी ज्यांनी ट्विट करुन डिलीट केले. त्या आमच्या आदित्य ठाकरेंचे नाक कापू नका एवढीच सर्व नेत्यांना माझी विनंती आहे. असा टोमणा भाजप प्रदेशउपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडी नेत्यांना लगावला आहे.

- Advertisement -

आदित्य ठाकरेंनी काय म्हटले होते

राज्यात मोफत लसीकरण करण्यात येणार अशी घोषणा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली. यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले होते. आदित्य ठाकरेंनी लसीकरणाबाबत ट्विट करुन डिलीट केले आणि मोफत लसीकरणाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही तसेच निर्णय झाल्यावर उच्चाधिकार समितीमार्फत घोषणा करण्यात येईल तसेच नागरिकांच्या मनात संभ्रम नको यासाठी ट्विट डिलीट केले असल्याचे दुसरे ट्विट करुन सांगितले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -