घरताज्या घडामोडीMLC Election Result 2021: अकोला नागपूर निवडणुकीत भाजपकडून मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार, नवाब...

MLC Election Result 2021: अकोला नागपूर निवडणुकीत भाजपकडून मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार, नवाब मलिकांचा हल्लाबोल

Subscribe

अकोला आणि नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या बाजुने निकाल लागला असला तरी मोठ्याप्रमाणावर घोडेबाजार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैसे देऊन मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झाला आहे हे थांबले पाहिजे. ज्याप्रमाणे राज्यसभेत कायदा करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर कायदा झाला पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

राज्यसभेत पैसे घेऊन क्रॉस वोटींग होत असताना संसदेत पक्षाचा व्हीप असेल त्याप्रमाणे मतदान करण्याचा कायदा करण्यात आला आहे. विधानपरिषदेच्या बाबतीतही संसदेत कायदा करण्याची गरज आहे असेही नवाब मलिक म्हणाले. राज्य सरकारला अधिकार असेल तर आम्ही कायदा करू मात्र अधिकार नसेल तर संसदेत केंद्रसरकारने कायदा करुन ही सगळी निवडणूक पारदर्शक व उघडपणे मतदान पध्दतीने झाली पाहिजे. तशा प्रकारची शिफारस केंद्र सरकारकडे करु असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या जागांवर निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये नागपूर आणि अकोला वाशिम बुलढाण्यात भाजपचा विजय झाला आहे. नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे तर अकोल्यात वसंत खंडेलवाल यांचा विजय झाला आहे. शिवसेना आणि काँग्रेसचा या निवडणूकीमध्ये पराभव झाला आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे मत मोठ्या प्रमाणात फोडण्यात भाजपला यश आलं आहे. या विरोधातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

असा घोडेबाजार लोकशाहीला घातक – नाना पटोले

दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानपरिषद निवडणूकीच्या निकालानंतर भाजपवर हल्लाबोल केला आहे. नागपूरच्या निवडणुकीमध्ये विशेषकरुन ज्या प्रकारचा घोडेबाजार झाला. नागपूरमध्ये स्वतःच्या पक्षातील मतदार होते त्यांना सहलीला नेले. आपल्याच मतदारावर विश्वास नसणारा भाजप आहे. अशा प्रकारचा घोडेबाजार करुन निवडणूक जिंकता आली. या प्रकारचा घोडेबाजार होणे हा लोकशाहीला घातक आहे. आता जो निकाल आला आहे त्याचे स्वागत केलं पाहिजे असे नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : नागपूरमध्ये भाजपनं गड राखला, चंद्रशेखर बावनकुळे १७६ मतांनी विजयी, खंडेलवाल अकोल्यातून विजयी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -