घरपालघर'त्या' कारखान्याचे अतिक्रमणच; स्थळपाहणी अहवालात अतिक्रमण उजेडात

‘त्या’ कारखान्याचे अतिक्रमणच; स्थळपाहणी अहवालात अतिक्रमण उजेडात

Subscribe

नवली येथील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून डिलक्स रिसायकलिंग कंपनीने पालघर नगरपरिषदेच्या राखीव भूखंडावर बेकायदा बांधकाम केल्याचे स्थळ पाहणी अहवालात उजेडात आले आहे.

नवली येथील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून डिलक्स रिसायकलिंग कंपनीने पालघर नगरपरिषदेच्या राखीव भूखंडावर बेकायदा बांधकाम केल्याचे स्थळ पाहणी अहवालात उजेडात आले आहे. त्यामुळे नगरपरिषद आता कधी कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे. पालघर नगरपरिषदेच्या हद्दीतील मौजे नवली येथील सर्वे नंबर ४८ पैकी ७० गुंठे जमिनीवर खेळाचे मैदानाचे आरक्षण आहे. डिलक्स रिसाकलिंग कंपनीने या जागेवर अतिक्रमण करून बेकायदा बांधकाम केल्याच्या तक्रारी गेल्या काही वर्षांपासून केल्या जात आहेत. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पालघर तहसिलदारांनी मंडळ अधिकाऱ्यांना वस्तुस्थितीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे १ डिसेंबर २०२१ रोजी मंडळ अधिकारी यांनी तहसिलदारांना पंचनामा सादर केला होता. त्याआधारे तहसिलदारांनी ६ डिसेंबर २०२१ रोजी पालघर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना हे बांधकाम निष्कासित करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच पालघर नगरपरिषद यांची आहे, असे कळवले होते. पण नगरपरिषदेकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती.

पालघरच्या सहाय्यक नगररचना विभागाने २१ जानेवारीला बिट अधिकाऱ्यांमार्फत पंचनामा करण्यात आला होता. त्यात कंपनीने अनधिकृत बांधकाम केल्याचे उजेडात आले होते. त्यानंतर नगरपरिषदेने हद्द निश्चित करण्याबाबत तहिसलदारांना विनंती केली होती. तर कंपनीच्या बांधकामावर कारवाई करण्यात यावी. यासाठी तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण केले होते. तहसिलदारांच्या आदेशानुसार २५ फेब्रुवारीला पालघरचे मंडळ अधिकारी वसावे, तलाठी नवली, नगरपरिषदेचे सहाय्यक नगररचनाकार अरूण जाधव, पदनिर्देशित अधिकारी उमाकांत पाटील, बिट निरीक्षक घनश्याम घरत, सहाय्यक बिट निरीक्षक निलेश धामोडा यांच्या पथकाकडून जावेद लुलानिया, विजय घरत, नदीम शेख, के. व्ही. नारायणन, भुपेंन्द्र शर्मा, सुनील उघडे, भाऊसाहेब गुंड, कंपनी व्यवस्थापनाचे मयंक विनोद दोशी यांच्या समक्ष स्थळ पाहणी करण्यात आली.

- Advertisement -

या पाहणीत कंपनीने नगरपरिषदेच्या जागेवर अतिक्रमण करून बेकायदा बांधकाम केल्याचे उजेडात आले आहे. तसा अहवाल मंडळ अधिकार्यांचनी दिला असून नगरपरिषदेला हद्दही निश्चित करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता नगरपरिषद सदर कारखान्यावर कधी कारवाई करतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

(नदीम शेख हे पालघर वार्ताहर आहेत.)

- Advertisement -

हेही वाचा – 

Russia Ukraine War: ३६ देशांच्या फ्लाईट्स रशियाकडून बॅन, युरोपियन देशांच्या निर्बंधांनंतर रशियाचा पलटवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -