घरताज्या घडामोडीRaj Thackeray reaches Delhi : मनसे-भाजप युतीसाठी राज ठाकरे दिल्ली दरबारी दाखल

Raj Thackeray reaches Delhi : मनसे-भाजप युतीसाठी राज ठाकरे दिल्ली दरबारी दाखल

Subscribe

नवी दिल्ली – महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाची सार्वत्रिक निवडणुकीत युती होण्याचे संकेत बऱ्याच दिवसांपासून मिळत होते. आता मनसे प्रमुख राज ठाकरे स्वतः दिल्ली दरबारी दाखल झाले आहे. महायुतीत सामील होऊन मनसे महाराष्ट्रात किती जागा लढणार हे लवकरच निश्चित होणार आहे.

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भाजप आणि महायुतीतील प्रमुख सहकारी शिंदे गटातील नेत्यांसोबतच्या गाठीभेटी वाढल्या आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वाढलेल्या भेटीगाठींवरून मनसे महायुतीत सहभागी होणार अशा चर्चा सुरु झाल्या. याशिवाय मनसे नेत्यांची भाजपच्या कार्यक्रमांना उपस्थिती वाढली होती. त्यामुळे मनसे-भाजपा युतीचे संकेतही मिळत होते. अशातच मनसे-भाजपा युतीच्या हालचालींना वेग आला. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीला रवाना झाले आणि सोमवारी रात्री ते दिल्लीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी सकाळीच दिल्लीला रवाना झाले होते.

युतीची घोषणा मुंबईत की दिल्लीत 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी रात्री दिल्लीत पोहोचले. अशीही माहिती आहे की, मागील चार दिवसांत त्यांचा हा दुसरा दिल्ली दौरा आहे. राज ठाकरे यांच्या या दिल्लीवारीवरुन आता मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांना पूर्ण विराम मिळण्याची शक्यता आहे. मनसे – भाजप युतीची घोषणा आता मुंबईत होणार की दिल्लीत याचीच प्रतिक्षा आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. दिल्ली श्रेष्ठींचा निरोप त्यांनी राज ठाकरेंना दिला होता. त्याच दिवशी राज ठाकरे भाजपसोबत जातील, असं सांगितलं जात होतं. मात्र राज ठाकरेंनी युती-आघाडीच्या चर्चा अशा पत्रकार परिषदेत होत नसतात म्हणत प्रश्न उडवून लावला होता. शिवेसना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दोन दिवसांपूर्वीच भाकित वर्तवलं होतं की एक मोठा राजकीय स्फोट होणार आहे, त्यांचा रोख हा राज ठाकरे यांच्या भाजपसोबतच्या युतीचा असल्याचे मानले जात आहे.

महायुतीचे जागावाटप निश्चित?

महायुतीचे जागावाटप निश्चित झाले असून भाजप 30, शिंदे गट 12, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 4 आणि मनसेला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाला निवडून येऊ शकतील अशाच जागा देण्याचे ठरले आहे. मनसेला महायुतीत सहभागी करुन घेतल्यानंतर त्यांना मुंबईतील एक आणि मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमधील एक लोकसभा मतदारसंघ मिळण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा : MNS with Mahayuti : ठरलं! मनसे महायुतीमध्ये, दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी?

बाळा नांदगाकरांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंसोबत असलेले पक्षाचे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील माझगाव विधानसभा मतदारसंघातून ते आमदार राहिले आहेत. तर मनसेच्या वाट्याला दुसरा मतदारसंघ हा नाशिक असणार आहे. नाशिककरांनी महापालिकेच्या माध्यमातून सर्वात प्रथम मनसेला सत्ता दिली होती. येथे पक्षाचे तीन आमदार निवडून आले होते. त्यामुळे नाशिक मतदारसंघ मनसेला दिला जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -