घासलेट चोर… माकडाची कुंडली… मिटकरींच्या टीकेवर मनसेचा जोरदार पलटवार

मनसे नेते गजानन काळे यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Gajanan kale

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून हिंदू सण जोरात साजरे केले जातात, असे शिंदे फडणवीस सरकारचे म्हणणे आहे. हे सरकार आल्यापासून सर्वच हिंदू सण धुमधडाक्यात साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील गुढीपाडव्याच्या मेळाव्यात रामनवमी जोरदार साजरी करा, असे जनतेला आवाहन केले होते. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. आता यावर मनसे नेते गजानन काळे यांनी जोरदार पलटवार केला आहे.

अमोल मिटकरींचे ट्वीट काय

रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित “हिंदू जननायक” परदेश दौऱ्यावर पळाले. त्यामुळे आता राम नवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे, असे ट्वीट करत अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना लक्ष्य केले. तसेच, सिनेमाच्या गाण्यातील ओळी ट्वीट करत, टोला लगावला आहे. मिटकरी यांनी “हंस चुगेगा दाना तिनका l कौआ मोती खायेगा ll” या ओळी ट्वीट केल्या आहेत.

गजानन काळेंचा पलटवार

गूगल वर “घासलेट चोर”टाकले की या मटणकरी माकडाची कुंडली दिसते. स्वतःच्या पक्षाच्या अधिवेशनात ‘जाणते राजे’ हजर होणार त्या दिवशीच याचे सो कॉल्ड ‘दादा’ परदेशीवारी ला गेले होते विसरला वाटतंय. पण याला काळजी माझ्या नेत्याची. ते म्हणतात ना स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून. असो या औरंगजेबाच्या औलादीच्या तोंडून प्रभू श्रीरामाचे नाव निघाले हेच माझ्या नेत्याचे यश, असे ट्वीट करत गजानन काळे यांनी मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

( हेही वाचा :भाजप -शिंदे शिवसेनेचे जागावाटप कसे होणार? अमित शाहांनी दिले ‘हे’ उत्तर )

 

काय म्हणाले होते राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यात जोरदार भाषण करत, हिंदू बांधवांना आवाहन केले होते. रामनवमी जोरदार साजरी करा, असे त्यांनी आपल्या सभेतून हिंदूंना सांगितले होते. राज ठाकरे म्हणाले होते की, माझी तमाम हिंदू बांधवांना विनंती आहे की, येणारी रामनवमी जोरदार साजरी करा. त्याचबरोबर 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळेला मी स्वत: रायगडावर जाणार आहे. तुम्ही पण या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते.