घरमहाराष्ट्रफायर आजींमुळे निदान मुख्यमंत्री घराबाहेर आले; मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

फायर आजींमुळे निदान मुख्यमंत्री घराबाहेर आले; मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

Subscribe

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर राणा दाम्पत्यांविरोधात आंदोलन करत पाहारा दिला.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर राणा दाम्पत्यांविरोधात आंदोलन करत पाहारा दिला. या शिवसैनिकांमध्ये राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी मातोश्रीबाहेर 80 वर्षाच्या आजींचाही समावेश होता. या आजीबाईंनी मी बाळासाहेबांपासून कट्टर शिवसैनिक असल्याचं सांगितलं होतं. तसंच, पुष्पा स्टाईलमध्ये आजींनी मातोश्रीबाहेर पाहारा दिला. याच फायर आजींची काल मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब भेट घेतली. मात्र, त्यांच्या या भेटीनंतर मनसेकडून उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात आली.

शिवसैनिकांकडून करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या ८० वर्षांच्या आजींची ठाकरे कुटुंबीयांनी भेट घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे रविवारी या आजींच्या घरी गेले होते. या भेटीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खोचक ट्विट करून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “त्या आजींचा सत्कार केला पाहिजे. त्यांच्यानिमित्ताने का होईना घराबाहेर तर पडले. धन्यवाद आजी”, असे देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

संदीप देशपांडे यांच्या या टीकेला शिवसेनेच्या गोटातून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार हे पाहावे लागेल. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे यांनी चंद्रभागा शिंदे यांची त्यांच्या परळ येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. शनिवारी मातोश्रीबाहेर झालेल्या आंदोलनावेळी ८० वर्षांच्या चंद्रभागा शिंदे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

रविवारी उद्धव ठाकरे सहकुटुंब त्यांच्या घरी गेले होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिंदे आजींचा सत्कार करण्यात आला. आजींनी मुख्यमंत्र्यांकडे नातवासाठी नोकरी आणि घराची मागणी केली. येत्या रविवारी त्यांच्या नातवाचे लग्न असून, त्याची पत्रिकाही मुख्यमंत्री ठाकरे यांना देण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – सोमय्यांना झालेली जखम हल्ल्यामुळेच झाली का?, पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासणार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -