घरमहाराष्ट्रराज ठाकरेंच्या नव्या घरी पाळणा हलणार, अमित ठाकरे बाबा होणार

राज ठाकरेंच्या नव्या घरी पाळणा हलणार, अमित ठाकरे बाबा होणार

Subscribe

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहकुटुंब नुकतेच 'कृष्णकुंज' निवासस्थान सोडून 'शिवतीर्थ' या नव्या घरी राहण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहुल लागल्यानं घरात आनंदाचं वातावरण आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थ या आपल्या नव्या निवासस्थानी राहायला गेलेत. आता राज ठाकरेंच्या त्याच घरी लवकरच पाळणा हलणार आहे. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली ठाकरे हे लवकरच आई-बाबा होणार आहेत. विशेष म्हणजे मराठी भाषा दिनाच्या दिवशीच अमित ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली. त्यामुळे त्यांचं राजकीय प्रमोशन झाल्याचं बोललं जात होतं. पण आता कौटुंबिक जीवनातही त्यांचं प्रमोशन होणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागलीय.

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहकुटुंब नुकतेच ‘कृष्णकुंज’ निवासस्थान सोडून ‘शिवतीर्थ’ या नव्या घरी राहण्यासाठी गेलेत. त्यामुळे नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहुल लागल्यानं घरात आनंदाचं वातावरण आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा 27 जानेवारी 2019 रोजी मिताली बोरुडे हिच्यासोबत परळच्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये विवाह झाला.

- Advertisement -

कोण आहेत मिताली ठाकरे?

मिताली ही मुंबईचे प्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडे यांची मुलगी आहे. बी. जी. सोमानी आणि वांद्र्याच्या फॅशन इन्स्टिट्यूटमधून तिने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण पूर्ण केलं. एवढेच नाही तर राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी आणि मिताली या दोघीही एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत. मितालीने उर्वशी ठाकरेंसोबत द रॅक नावाचं बुटिकसुद्धा आहे. ‘राज’पुत्र अमित ठाकरे हे आता सक्रिय राजकारणात उतरले आहेत. मनसेच्या महाअधिवेशनात त्यांचे राजकीय लॉचिंग झाले. शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे आमदार बनून विधानसभेत गेले आणि कॅबिनेट मंत्रीही झाले. त्यानंतर आता दुसरे ठाकरे राजकारणात आपलं नशीब आजमावत आहेत. पुढची दहा वर्ष ही अमित ठाकरेंची असणार आहेत, असंही प्रसिद्ध ज्योतिष पंडित राजकुमार शर्मा यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

पत्नी मिताली ठाकरे अमितसाठी लकी

अमित ठाकरे यांची पत्नी मितालीच्या कुंडलीचा अमितच्या कारकिर्दीवर सकारात्मक परिणाम झाल्याचे गेल्या काही दिवसांपूर्वी एका पंडितजींनी सांगितले होते. अमितसाठी ती भाग्य घेऊन आलीय. आई-वडिलांचा आशीर्वाद प्रत्येक मुलावर असतोच. मात्र जीवनसाथी म्हणून असलेल्या स्त्रीच्या ग्रहताऱ्यांचा मोठा परिणाम राजकीयच नव्हे तर प्रसिद्धी क्षेत्रात काम करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींवर प्रकर्षाने जाणवत असतो, अशी भविष्यवाणी करणाऱ्या पंडित राजकुमार शर्मा यांनी केलीय. तसेच 2014 साली कोणताही संकेत नसताना नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होतील, अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती आणि ती तंतोतंत खरी ठरल्यानंतर पंडित राजकुमार शर्मा राष्ट्रीय स्तरावरील राजकारणात प्रकाशझोतात आले होते.

- Advertisement -

हेही वाचाः Russia-Ukraine War : अमेरिकेच्या निर्बंधांवर पुतिन यांचा पलटवार, अमेरिका अन् मित्र राष्ट्रांवर केली कारवाई

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -