घरताज्या घडामोडीआजोबांनी दिलेला 'ठाकरी' बाणा, पुढच्या पिढीत आला...; राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट

आजोबांनी दिलेला ‘ठाकरी’ बाणा, पुढच्या पिढीत आला…; राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट

Subscribe

केशव सीताराम ठाकरे अर्थात प्रबोधनकार ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील बिनीचे शिलेदार, समाजसुधारक, पत्रकार, फर्डे वक्ते म्हणून प्रबोधनकार ठाकरे यांना ओळखले जाते. प्रबोधकारांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे नातू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केले आहे.

केशव सीताराम ठाकरे अर्थात प्रबोधनकार ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील बिनीचे शिलेदार, समाजसुधारक, पत्रकार, फर्डे वक्ते म्हणून प्रबोधनकार ठाकरे यांना ओळखले जाते. प्रबोधकारांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे नातू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केले आहे. एका पोस्टच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधनकारांना अभिवादन केले. या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी ‘त्यांनी दिलेला ‘ठाकरी’ बाणा, जो माझ्यासह पुढच्या पिढीत आलाय’, असं लिहिले आहे. (MNS Raj Thackeray Post On Prabodhankar Thackeray Death Anniversary)

राज ठाकरेंची पोस्ट

“आज आमच्या आजोबांची – प्रबोधनकारांची पुण्यतिथी. अन्याय दिसला तर लाथ मारायची, जे खरं असेल ते ठासून मांडायचं, आणि हे करताना नफा, नुकसान असल्या क्षुल्लक गोष्टींचा विचार करायचा नाही, हा आजोबांनी दिलेला ‘ठाकरी’ बाणा, जो पुढच्या पिढीत आला आणि माझ्यातपण आला. मी आजोबांनी रुजवलेला हा ठाकरी बाणा कायम कटाक्षाने अंमलात आणायचा प्रयत्न करत आलोय आणि पुढे पण करत राहीन. आणि हेच बाळकडू पुढे पण देईन हे नक्की”, असे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहेत.

- Advertisement -

प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे लोकार्पण उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते केले जाणार आहे. या लोकार्पण सोहळ्यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर आज एकाच व्यासपीठावर येणार आहेत. सायंकाळी साडे सात वाजता दादर येथील शिवाजी मंदिरात हा सोहळा होणार आहे. प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे म्हणून ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, १७ सप्टेंबर २०१० रोजी प्रबोधनकारांच्या १२५ व्या जन्मदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ‘पद्मश्री’ नामदेव ढसाळ यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे उद्घाटन झाले होते. आता बदलत्या तंत्रज्ञानानुसार प्रबोधन प्रकाशनचे हे संकेतस्थळ नव्या स्वरूपात आणले जात असून त्याचे लोकार्पण केले जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपाकडून शिवरायांचा अपमान, शिंदे – फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा; राऊतांची मागणी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -