घरमहाराष्ट्रमान्सून शनिवारीच महाराष्ट्रात दाखल

मान्सून शनिवारीच महाराष्ट्रात दाखल

Subscribe

 मान्सून शनिवारी महाराष्ट्रात दाखल झाला असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खरेतर राज्यातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली होती. त्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती. ते भाकीत आता खरे ठरताना दिसत असून मान्सून सक्रिय झाल्याने राज्यात शेतीच्या कामांना वेग आला आहे.

हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करत महाराष्ट्रात मानसून दाखल झाल्याची माहिती दिली आहे. दक्षिण कोकणात हर्णेपर्यंत आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोलापूरपर्यंत मानसूनची हजेरी लागली आहे. मराठावाड्यातील काही सलग्न भागातही मान्सून सक्रिय झाला आहे. ही परिस्थिती पुढच्या वाटचालीसाठी अनुकूल आहे. राज्यात सरासरीइतका किंवा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज असला, तरी मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

- Advertisement -

खरीप हंगामातील पिकांच्या दृष्टीने पावसाचा अंदाज सकारात्मक आहे. देशात यंदा सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यासंदर्भातले परिपत्रक हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर यामध्ये होणार्‍या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -