घरताज्या घडामोडीSanjay Raut : मी थुंकलो कारण... संजय राऊतांचा खुलासा

Sanjay Raut : मी थुंकलो कारण… संजय राऊतांचा खुलासा

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यावर खासदार संजय राऊत माध्यमांसमोरच थुंकले. त्यांचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचप्रमाणे शिंदे गटाकडून टीकास्त्र सोडलं जात आहे. परंतु माध्यमांसमोर थुंकण्याचं कारण काय?, याबाबतचा खुलासा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मी थुंकलो कारण…

खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, थुंकण्यावर बंदी आहे का?, सरकारनं तसा अध्यादेश काढावा की, या राज्यात आणि देशात थुंकण्यावर बंदी आहे. माझ्या जिभेला त्रास झाला. जीभ दाताखाली आली म्हणून थुंकलो. मी कुणाच्या तरी नावानं थुंकलो असं कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

पत्रकारांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यावर संजय राऊत माध्यमांसमोरच थुंकले. त्याआधी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता, उत्तरादाखल संजय राऊत थुंकले होते. यावेळी शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी राऊतांवर टीका करत आधी भुंकायचे, आता थुंकताहेत असं म्हणत राऊतांवर निशाणा साधला आहे.

थुंकणं ही कुठली प्रवृत्ती आणि संस्कृती?

डॉ. ज्योती वाघमारे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून राऊतांवर टीका केली आहे. महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे. संयमानं टीका करण्याची परंपरा असणाऱ्या या महाराष्ट्रातील राजकारणाच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचं काम दररोज संजय राऊत करत आहेत. खरंतर राजकारणात प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. ती नाही आली तर मान्य करावं लागतं. परंतु प्रश्नाला उत्तर देण्यासाठी थुंकणं ही कुठली यांची प्रवृत्ती आणि संस्कृती आहे. हिच लोकं विचार, वारसा आणि इतर गोष्टींविषयी बोलत असतात. मग अशा थुंकीबहाद्दर प्रवक्त्यांना घेऊन ज्या पक्षप्रमुखाला राजकारण करायचं असेल त्याला आमच्या शुभेच्छा आहेत, असं डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा : आधी भुंकायचे, आता थुंकताहेत, ज्योती वाघमारेंची राऊतांवर टीका

जीभ वाकडी झाल्यामुळे ते थुंकताहेत

संजय राऊत याआधी दररोज सकाळी लाळघोटेपणाकरून आपल्या मालकाला खूश करण्यासाठी भुंकायचे. पण आता कदाचित डोक्यावर परिणाम झाल्यामुळे ते आता थुंकू सुद्धा लागलेत. संजय राऊतांना वेड्यांच्या इस्पीतळात भरती करण्याची गरज आहे. सिल्व्हर ओकची आयुष्यभर थुंकी चाटत आणि या बोटाची थुंकी त्या बोटावर करत आयुष्य गेलेल्या राऊतांची शेपूट वाकडी असल्यामुळे ते भुंकायचे. मात्र, आता त्यांची जीभ वाकडी झाल्यामुळे ते थुंकताहेत, असं म्हणत वाघमारे यांनी राऊतांवर धारेवर धरलं.

नारायण राणेंना दिली शिवी

खासदार संजय राऊत यांच्याकडूनही तशाच प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात. साधारणपणे चार-पाच महिन्यांपूर्वी खासदार राऊत यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता, “अरे सोड रे *** आहे तो”, असे संजय राऊत म्हणाले. नेमके याचवेळी दुसरा पत्रकार संजय राऊत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौराबाबत प्रश्न विचारत होता. त्याचाच संदर्भ घेत भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाराष्ट्राच राजकारण कोणत्या थराला नेत आहात संजय राऊत? असा सवाल करत संजय राऊत यांच्याकडे माफीची मागणी केली. त्यानंतर दोघांमध्ये ट्विटरवॉर रंगले आणि नंतर दोघांनीही ट्वीट डिलीट केले.


हेही वाचा : Sanjay Raut : कधी शिवी तर कधी थुंकणे… पूर्वाश्रमीच्या शिवसेना नेत्यांवर संजय राऊत यांचा राग


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -