घरमहाराष्ट्रSupriya Sule : ...त्यातून महाराष्ट्राचे नुकसान होतेय हे अतिशय दुर्दैवी; सुप्रिया सुळे...

Supriya Sule : …त्यातून महाराष्ट्राचे नुकसान होतेय हे अतिशय दुर्दैवी; सुप्रिया सुळे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Subscribe

मुंबई : गरीब कष्ट करणार्‍यांनी मेरीटवर नोकर्‍या मिळवल्या आहेत. पण आठ महिने हक्काचा पगार त्यांना मिळत नाही. सगळ्या गोष्टी विकण्याचे एक कटकारस्थान केंद्र सरकार (Union government) करत आहे, त्यातून महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. हे अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगत, सातत्याने महाराष्ट्राला केंद्र सरकार जी वागणूक देत आहे, त्या धोरणाचा जाहीर निषेध खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे.

एनटीसीच्या (NTC) चार हजार गिरणी कामगारांना गेले आठ महिने हक्काचा पगार मिळाला नाही, त्याबद्दल शुक्रवारी एनटीसी हाऊसच्या बाहेर कामगारांनी आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या कामगारांची भेट देऊन मागण्या जाणून घेतल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर (Raigad Fort) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सत्ताधारी पक्षातील अनेक नेते उपस्थित होते. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यासह अनेक बडे राजकीय नेते मंडळीदेखील उपस्थित होते. मात्र, शिवराज्याभिषेक सोहळा अर्ध्यावर आलेला असताना सुनील तटकरे माघारी आले. आज मी एक शिवभक्त नागरिक म्हणून येथे आलो होतो. मी या विभागाचं लोकसभेत प्रतिनिधित्व करतो. एक शिवभक्त म्हणून माझ्या भावना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करण्याची राजशिष्टाचारानुसार असणारी माझी संधी का डावलली गेली? मला माहिती नाही, असे सुनील तटकरे म्हणाले.

यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सुनील तटकरे हे स्थानिक खासदार असताना बोलायला दिले नाही, याचे मला आश्चर्य वाटत नाही. स्थानिक लोकांचा आदर करण्याची पद्धत यांच्याकडे नाही. कुठेही गेले तरी लोकांचा अपमानच करतात असा थेट हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केला.
महाराष्ट्र सदनात कार्यक्रम झाला तिथेही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा ज्या पद्धतीने हटवण्यात आला, हे अतिशय दुर्दैवी आहे. महापुरुषांचा अपमान करणे किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींचा अपमान करणे, ही ईडी सरकारची पद्धत आहे आणि महाराष्ट्राचा अपमान करण्यातच केंद्र सरकारला आनंद मिळतो, हे त्यांच्या वागणुकीतून दिसते, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -