महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना देशद्रोहाच्या कायद्यानुसार शिक्षा करा; उदयनराजे भोसलेंची मागणी

mp udayanraje bhosle aggressive over governor bhagat singh koshyari chhatrapati shivaji maharaj controversy statement

व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली सर्वांना अधिकार दिली आहे का शिवाजी महाराज किंवा थोर राष्ट्र पुरुषांचा अपमान करा? असा संतप्त सवाल आज खासदार उदयराजे भोसले यांनी केला, यासोबत छत्रपती शिवाजी महाराज आणि थोर पुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर देशद्रोहाच्या कायद्यानुसार कडक शिक्षा होण्यासाठी तसे कायदे केले पाहिजेत आणि अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी देखील उदयराजे भोसलेंनी केली आहे. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांषु त्रिपाठी यांच्यावर कारवाईची मागणी करण्यासाठी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यात शिवप्रेमी संघटनांची बैठक घेतली, या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी त्यांनी खंत व्यक्त केली.

उदयनराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाचे, आदर्शाचे विचार दिले. राजकीय स्वार्थापोटी सर्व पक्ष यात अपवाद कोणी नाही शिवरायांना आदर्श मानता. महाराष्ट्रात कोणताही राजकीय कार्यक्रम, सभेत महाराजांची प्रतिमा, प्रतिकृती पाहतो. महाराजांचा आदर्श घेत वाटचाल करतो असं सर्वजण म्हणतात. पण नेमक एवढ्या मोठ्याप्रमाणात नेहमीच विकृतपणे केलेलं वक्तव्य, चित्रीकरण, चित्रपट असेल यामाध्यामातून ज्या- ज्या वेळी महाराजांची अवहेलना केली जाते त्यांच्याबद्दल गलिच्छ पद्धतीने चित्र निर्माण केलं जात त्यावेळी राग कसा येत नाही? असा संतप्त सवालही त्यांनी व्यक्त केला.

राज्यपालांच्या वक्तव्यावरून उदयराजे भोसले आज खूप आक्रमक झाले होते. सर्व पक्षांचा अजेंडा वेगळा असेल पण शिवाजी महाराजांच नाव घेता तेव्हा तुमचा मुळ बोध अजेंडा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारचं आहेत. नसतील तर शिवाजी महाराजांचे नाव तरी कशाला घेता? शिवाजी महाराजांबद्दलचे विकृतीकरण थांबले नाही तर भावी पिढी त्यांच्यासमोर मोडलेला तोडलेला, सोयीप्रमाणे मांडलेला इतिहास काय समजणार आहे? त्यांना हा इतिहास खरचं वाटेल. असा उदयराजे भोसले म्हणाले.

देशात सध्या सुरु असलेले विकृतीकरण थांबवले पाहिजे. शिवाजी महाराजांबाबत जर कोणी वेडं वाकडं बोलत असेल आणि राजकीय नेते शांत बसत असतील शिवाय अशा लोकांवर कारवाई करत नसतील तर महाराजांचं नाव घेण्याचा कोणाला अधिकार नाही, अशी भूमिकाही उदयराजे भोसलेंनी केली आहे.

छत्रपती शिवरायांवर बोलताना उदयराजे भावूक

छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलताना उदयनराजे भोसले पत्रकार परिषदेत अचानक भावूक झाले आहेत. छत्रपतींचा अपमान होत असल्याचे पाहून मनाला वेदना होतात. महाराजांचा अपमान होत असेल तर कोणाच्याही डोळ्यात अश्रू येणारचं. शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यावर इथं आलेल्या प्रत्येकाची हीच भावना आहे. मी हतबल आहे असं समजा. कारवाई होईल अशी अपेक्षा आहे असे म्हणताना ते भावूक झाले. जर महाराजांची प्रतिमा मलिन होत असेल आणि प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई होत नसेल तर विमानतळांना महाराजांची नावं का द्यावीत? शिवाजी महाराजांची जयंती तरी का साजरी करावी? असा प्रश्नही उदयराजे भोसलेंनी उपस्थित केला आहे.


भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होण्याआधीच संजय राऊतांना आनंद, म्हणाले महाराष्ट्राच्या शत्रूंशी…