घरमहाराष्ट्रतालिबानी संघटनेकडून मुंबई उडवण्याची धमकी, एनआयएला ई-मेल; सुरक्षा यंत्रणा सतर्क

तालिबानी संघटनेकडून मुंबई उडवण्याची धमकी, एनआयएला ई-मेल; सुरक्षा यंत्रणा सतर्क

Subscribe

Threating Email | मेल पाठवणाऱ्याने स्वतःला तालिबानी संबोधलं असून या ई-मेलनंतर सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हा ई-मेल कुठून आला, कोणी पाठवला याची चौकशी सुरू झाली आहे.

Threating Email | मुंबई – मुंबईकरांना सतर्क करणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेला (National Investigation Agency) एक ई-मेल प्राप्त झाला असून या ई-मेलमधून मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. मेल पाठवणाऱ्याने स्वतःला तालिबानी संबोधलं असून या ई-मेलनंतर सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हा ई-मेल कुठून आला, कोणी पाठवला याची चौकशी सुरू झाली आहे.

हेही वाचा – राम जन्मभूमी उडवण्याची पुन्हा धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

- Advertisement -

राष्ट्रीय तपास यंत्रणेने याबाबत मुंबई पोलिसांना सतर्क केलं असून दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या अनेक शहरांत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एनआयए आणि मुंबई पोलीस यांच्याकडून संयुक्तरित्या कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, सार्वजनिक ठिकाणे, विमानतळ, रेल्वे स्थानकांसह अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-मेल पाठवण्याऱ्याने तो तालिबानी असल्याचं म्हटलं आहे. तसंच, तालिबानी संघटनेचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानीच्या आदेशानुसार ही धमकी दिली जात असल्याचा दावा केला आहे.

- Advertisement -


धीरुभाई शाळेतही धमकीचा फोन 

जानेवारी महिन्यात मुंबईच्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत एक धमकीचा फोन आला होता. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने शाळा उडवून देण्याची धमकी दिली होती. शाळेच्या लॅण्डलाईन क्रमांकावर हा फोन आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली होती. या अज्ञात व्यक्तीने शाळेत बॉम्ब ठेवण्याचा दावा केला होता. याप्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी केली होती.

राम मंदिर उडवण्याची धमकी

दरम्यान, काल, गुरुवारी अयोध्यातील राम जन्मभूमी उडवण्याची धमकी देण्यात आली होती. मनोज कुमार यांना हा धमकीचा फोन गुरुवारी आला. हा फोन साडेपाचच्या सुमारास आला. सकाळी १० वाजेपर्यंत राम जन्मभूमी बॉम्बने उडवली जाईल, अशी धमकी फोन करणाऱ्याने दिली. मनोज कुमार यांनी धमकीच्या फोनची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात याची तक्रार नोंदवली आहे. हा फोन कोणी केला. फोन कुठून आला. याची चौकशी पोलीस करत आहेत. याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. धमकीचा फोन आल्यानंतर गुप्तचर यंत्रणांनीही चौकशी सुरु केली आहे.

हेही वाचा – आशिष शेलारांना पत्रातून जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून तपास सुरू

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -