घरमहाराष्ट्रअनिल परबांचा १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा; आता हायकोर्टाची सोमय्यांना नोटीस

अनिल परबांचा १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा; आता हायकोर्टाची सोमय्यांना नोटीस

Subscribe

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडून किरीट सोमय्या यांना समन्स बजावण्यात आलं आहे. २३ डिसेंबरपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे सोमय्यांना न्यायालयानं आदेश दिले आहेत.

किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर अनिल देशमुख प्रकरणात परब यांचाही सहभाग असल्याचा आरोप केला होता. तसंच, परब यांचं कोकणातील दापोलीत बेकायदेशीर हॉटेल तसेच परिवहन विभागातील बदल्यांच्या प्रकरणावरूनही सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. यावरुन अनिल परब यांनी सोमय्या यांना १४ सप्टेंबर रोजी नोटीस पाठवली होती. ज्यात ७२ तासांच्या आत त्यांनी आपल्याबाबत केलेले सर्व ट्विट डिलीट करण्याचा तसेच बिनशर्त माफी मागण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, सोमय्या यांनी माफी न मागितल्यामुळे परब यांच्यावतीने अॅड. सुषमा सिंग यांनी २१ सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणारी याचिका दाखल केली आहे.

- Advertisement -

७२ तासात लेखी माफी मागा अन्यथा

किरीट सोमय्या यांना अनिल परब यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली. ७२ तासांच्या आत लेखी माफी मागण्याची मागणी केली आहे. तसंच, माफी मागितली नाही तर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा देखील अनिल परब यांनी सोमय्या यांना दिला. सोमय्या वैयक्तिक द्वेषभावनेतून असे आरोप करत असल्याचं अनिल परब यांनी नोटीसीद्वारे म्हटलं आहे. या नोटीसीमध्ये किरीट सोमय्या यांनी केलेल्या वक्तव्यांचा आणि ट्विट्सचा संदर्भ देण्यात आला आहे.

माझ्यावर आरोप करुन माझी जनमाणसातील, पक्षातील प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे येत्या ७२ तासात लेखी माफीनामा हा कमीतकमी दोन इंग्रजी, हिंदी आणि मराठी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करावा आणि तुमच्या ट्विटर हँडलवर ते ट्विट करुन पीन करुन ठेवावं, असं अनिल परब यांनी नोटीसीमध्ये म्हटलं आहे. तसंच, अनिल परब यांच्याविरोधात जे ट्विट करण्यात आले आहेत ते सर्व ट्विट हटवावे, असं अनिल परब यांनी वकिलामार्फत किरीट सोमय्या यांना सूचना केली आहे. याशिवाय, अनिल परब यांनी साई रिसॉर्टच्या बांधकामाशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. या नोटीसीमध्ये वांद्रे येथील अनिल परब यांच्या कार्यालयाचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -