घरमहाराष्ट्रमुंबई - पुणे रेल्वे मार्ग पूर्ववत

मुंबई – पुणे रेल्वे मार्ग पूर्ववत

Subscribe

मध्यरात्री विस्कळीत झालेला मुंबई - पुणे रेल्वे मार्ग आता पूर्वपदावर आला आहे. मदुराई एक्सप्रेसचा डबा रूळावरून हटवण्यात आला आहे.

मध्यरात्री मदुराई एक्सप्रेसचा डबा घसरून विस्कळीत झालेला मुंबई – पुणे रेल्वे मार्ग आता पूर्वपदावर आला आहे. मध्यरात्री तीनच्या सुमारास खंडाळा येथे मदुराई एक्सप्रेसचा डबा घसरल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर पहाटे ३.३० वाजता रेल्वे प्रशासनाने वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परिणामी कर्जत – पुणे – कर्जत पॅसेंजर, सीएसएमटी – पुणे – सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस, पुणे – सीएसएमटी – पुणे सिंहगड एक्सप्रेस, पुणे -सीएसएमटी – पुणे प्रगती एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या. तर, भुसावळ पुणे एक्सप्रेस या गाडीचा मार्ग वळवण्यात आला. मुंबई – पुणे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. तर काही लोकांनी रस्ते वाहतुकीकडे आपला मोर्चा वळवला. विकेंण्ड असल्याने खंडाळामध्ये फिरायला जाणे किंवा कामानिमित्त मुंबई, पुण्यामध्ये असलेली लोकं सुट्टीच्या निमित्ताने घरी येतात. पण, गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्तापाला सामोरे जावे लागले.

प्रवाशांसाठी चहा, नाश्ताची सोय

मदुराई एक्सप्रेसचा डबा घसरल्याने प्रवाशांचे हाल झाले. परिणामी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचे हाल होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेत त्यांच्या चहा-नाश्ताची सोय केली. यावेळी मदुराई एक्सप्रेसमधील जवळपास ९०० प्रवाशांना चहा आणि नाश्ता देण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -