घरताज्या घडामोडीएक पेपर 3 मिनिटात तपासला जाणार

एक पेपर 3 मिनिटात तपासला जाणार

Subscribe

मुंबई विद्यापिठाचा नवा नियम

मुंबई विद्यपिठाने महाविद्यालयीन शिक्षकांसाठी नवीन नियम लागू केला आहे. ऑनलाईन पेपर तपासणीसाठी 3 मिनिटांचा कालावधी लागू केला आहे. ऑनलाईन पेपर तपासणी सुरू झाल्यापासून महाविद्यालयीन परिक्षानंतर पेपर तपासणीच्या प्रक्रियेवर नेहमीच गोंधळ होत आले आहेत. त्यामुळे आता हा नवीन नियम मुंबई विद्यापिठामार्फत आणण्यात आला आहे.

महाविद्यालयीन शिक्षकांनी कमीत कमी 3 मिनिटांत एक पेपर तपासणे गरजेचे आहे. ऑनलाईन पेपर तपासणीसाठी पहिल्यांदाच हा नियम मुंबई विद्यापिठाने लागू केला आहे. आगामी परीक्षांनंतर हा नियम शिक्षकांना लागू होणार आहे. पेपर काळजीपूर्वक तपासूनच मगच सबमिट करावा लागणार आहे. ऑनलाईन पेपर तपासणीच्या सॉफ्टवेअरमुळे पेपर तपासताना अनेक गोंधळ पहायला मिळाले होते. त्यामुळे आता सॉफ्टवेअरचे नवीन अपडेट डाउनलोड करणार असल्याचे बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अॅन्ड रिवॅल्युएशनने सांगितले आहे.

- Advertisement -

ऑनलाईन सॉफ्टवेअर वर पेपर कसे तपासावे यासाठी सर्व महाविद्यालयीन शिक्षकांना रितसर ट्रेनिंग देण्यात येते. परिक्षा झाल्यानंतर दरवर्षी 40,000 ते 50,000 विद्यार्थी पेपर रिवॅल्युएशन साठी टाकत असतात. त्यामुळे ऑनलाईन पेपर तपासणे हे शिक्षकांसाठी हि जवाबदारिचे काम आहे असं शिक्षकांनी म्हटलं आहे. ऑनलाईन पेपर तपासणीच्या कामात येणारे अडथळे कमी व्हावे यासाठी हा नवा नियम आणला असल्याचं बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अॅन्ड इवॅल्युएशनचे मुख्य विनोद पाटील यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -