घरमहाराष्ट्रपु्ण्यात प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीचा केला खून

पु्ण्यात प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीचा केला खून

Subscribe

गंभीर जखमी होऊन अल्पवयीन प्रेयसीच्या जागीच मृत्यू झाला

प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीचा ब्लेडने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. दरम्यान, हा सर्व प्रकार एका लॉजवर घडला आहे. श्रीराम सुग्रीव गिरी असे आरोपीचे नाव असून त्याचा शोध वडगाव पोलीस घेत आहेत.

अशी घडला प्रकार 

वडगाव मावळ येथील निसर्गवारा लॉजवर बुधवारी सकाळी हे दोघे गेले होते. दोघे ही लॉजवरील ३०३ क्रमांकाच्या रुमध्ये थांबले. मात्र त्यानंतर अज्ञात कारणावरून आरोपी प्रियकर श्रीराम सुग्रीव गिरी याने अल्पवयीन प्रेयसी च्या गळ्यावर, पोटावर आणि हातावर ब्लेडने वार करून खून केला आहे. यात गंभीर जखमी होऊन प्रेयसीच्या जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

हेही वाचा- नालासोपारा : वाहून गेलेला चिमुकल्याचा मृतदेह सापडला

दरम्यान, घाबरलेल्या श्रीराम घाईत निघाला तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांना ती आवरून खाली येत आहे, असे सांगून तो तेथील दुचाकीवरून पळाला. तेथील कर्मचारी रूमवर पाहणी करण्यासाठी गेले असता अल्पवयीन मुलीचा खून झाल्याचे समोर आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच, घटनेचा अधिक तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत. आरोपी प्रियकराची दुचाकी इंद्रायणी नदीकाठी मिळाली असून त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -