घरमहाराष्ट्रMuslim League : घटना कधी बदलता तेही सांगा! सचिन सावंत यांचा भाजपाला...

Muslim League : घटना कधी बदलता तेही सांगा! सचिन सावंत यांचा भाजपाला सवाल

Subscribe

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिका दौऱ्यावर मुस्लीम लीगबाबत (Muslim League) वक्तव्य केले. यावरून भाजपा (BJP) आक्रमक झाली आहे. इतिहास वाचण्याचा सल्ला भाजपाने राहुल गांधी यांना दिला आहे. यावर काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी पलटवार केला आहे. भाजपाच्या पक्षघटनेत (BJP Constitution) धर्मनिरपेक्ष, गांधींमार्गाने जाणारा पक्ष म्हटले आहे. घटना कधी बदलता तेही सांगा, असा सवाल त्यांनी भाजपाला केला आहे.

- Advertisement -

अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले माजी खासदार राहुल गांधी यांच्या नुकत्याच झालेल्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये वार-पलटवार पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनी मुस्लीम लीगबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. तुम्ही हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या भाजपाला विरोध करत लोकशाहीत धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलता, पण काँग्रेसची मुस्लीम लीगशी (IUML)केरळमध्ये युती आहे, जिथून तुम्ही खासदार आहात, असा मुद्दा वॉशिंग्टन डीसीमध्ये राहुल गांधी यांच्याकडे उपस्थित करण्यात आला. तेव्हा, मुस्लीम लीग हा पूर्णपणे सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) पक्ष आहे. मुस्लीम लीगमध्ये नॉन-सेक्युलर असे काहीही नाही, असे उत्तर राहुल गांधी यांनी दिले.

इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याच्या राहुल गांधी यांच्या विधानावर भाजपाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. केरळचा हा पक्ष मोहम्मद अली जिना यांच्या ऑल इंडिया मुस्लीम लीगच्या मानसिकतेला अनुसरतो, असे भाजपाने म्हटले आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेडा यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत याला प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय जनता पक्ष, विशेषत: केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाला केवळ मोहम्मद अली जिना यांची मुस्लीम लीग आठवत आहे. कारण यांचीच विचारसरणी असलेले पूर्वज श्यामा प्रसाद मुखर्जी यांनीही त्याच मुस्लीम लीगशी युती करून, सरकारे देखील स्थापन केली आणि पाकिस्तानचा ठराव संमत होऊ दिला, असे सांगून पवन खेडा म्हणाले की, आम्ही ज्या मुस्लीम लीगबद्दल बोलत आहोत ती म्हणजे आययूएमएल आहे.. ज्या इस्माईल यांनी ही मुस्लीम लीग स्थापन केली, ते संविधान सभेचे सदस्यही होते. हे तेच इस्माईल आहेत, ज्यांनी चीनसोबत 1962चे युद्ध सुरू असताना आपला मुलगा मियाँ खान याला भारतीय सैन्यात भरती होण्याचा आदेश दिला होता.

आता त्यापाठोपाठ काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही भाजपाला पक्षघटना बदलण्याचा सल्ला दिला आहे. राहुल गांधी यांनी भारतातील मुस्लिम लीगबद्दल मत व्यक्त केले आणि भाजपावाल्यांना आग लागली. धर्मनिरपेक्ष संघटनांचीच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पक्ष म्हणून नोंद केली जाते. मग आयोगाला सांगा नोंदणी रद्द करायला, आयोग तुमचाच आहे, असा टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे. भाजपाच्या पक्षघटनेत धर्मनिरपेक्ष, गांधींमार्गाने जाणारा पक्ष म्हटले आहे, तेव्हा घटना कधी बदलता ते ही सांगा, अशी टीका त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -