घरमहाराष्ट्रनागपूरसडक्या विचारांना...; 'द केरळ स्टोरी' चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची आव्हाडांवर टीका

सडक्या विचारांना…; ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची आव्हाडांवर टीका

Subscribe

नागपूर : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) चित्रपटाला विरोध होत असतानाही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी नागपूरमध्ये हा चित्रपट पाहिला आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार जितेंद्र आव्हाडांवर (Jitendra Awhad) टीका केली आहे.

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला धर्मांतरण आणि लव्ह-जिहादचा विषय बनवत देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. चित्रपटाला काही जण समर्थन करताना दिसत आहेत, तर काही विरोध करताना दिसत आहे. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घातली आहे, तर काही ठिकाणी बंदी घालण्याची मागणी होत आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांकडून काही ठिकाणी विशेष शोचे आयोजन करण्यात येत आहे. नागपुरातही मंगळवारी (9 मे) रात्री ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप महिला कार्यकर्त्यांसोबत हा चित्रपट पाहिला. यानंतर त्यांनी सांगितले की, या चित्रपटाच्या माध्यमातून कटू सत्य जनतेसमोर येत असल्याचा दावा करताना त्यांनी म्हटले की, हा चित्रपट केवळ कथा सांगण्यासाठी नसून लोकांना जागृत करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

- Advertisement -

नागपूर येथील मेडिकल चौकाजवळील मॉलमधील चित्रपट गृहात मंगळवारी सायंकाळी फडणवीस भाजपाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट बघायला गेले होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, आपल्या देशातील विदारक सत्य चित्रपटाच्या माध्यमातून समोर आले आहे. आपला देश पोखरण्याचे काम काही जणांकडून सुरू असून महिला व तरुणींची दिशाभूल करून त्यांना दहशतवादी षडयंत्रात ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे. या चित्रपटाच्या माध्यमाधून अनेक गोष्टी समोर आल्यामुळे देशातील अनेक लोकांचे डोळे उघडत आहेत. यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाडांवर जबरी टीका करताना वक्तव्य केले की, चित्रपटाच्या निर्मात्याला फाशी द्या असे वक्तव्य करणाऱ्यांच्या सडक्या मेंदूतील सडक्या विचारांना फाशी देण्याची गरज आहे.

- Advertisement -

आव्हाडांचे फासावर लटवण्याचे विधान
जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या नावाखाली एका राज्याची आणि त्या राज्यातील महिलांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इसिस संघटनेत धर्मांतर करून गेलेल्या महिलांचा अधिकृत आकडा 3 आहे, मात्र चित्रपटात हा आकडा ३२ हजार इतका दाखवण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्याला सार्वजनिकरित्या फासावर लटकवले पाहिजे, असे खळबळजनक विधान त्यांनी केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -