घरताज्या घडामोडीतळीये दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देणार

तळीये दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देणार

Subscribe

दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात येईल, राज्य आणि केंद्र सरकार पुन्हा एकदा तळीये गावाच्या ठिकाणी वसाहती बांधतील, असे आश्वासन नारायण राणे यांनी वेळी दिले

कोकणात अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज कोकण दौऱ्यासाठी रवाना झाले होते. नारायण राणेंनी आज महाडच्या तळीये गावीतील परिस्थिती आढावा घेतला. तळीये दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्याची मोठी घोषणा नारायण राणे यांनी केली आहे. (Narayan Rane announce Prime Minister Awas Yojana will provide houses to victims of Mahad Taliye village)
गुरुवारी तळीये गावातील ३२ घरांवर दरड कोसळून अनेकांचे संसार बेचिराक झाले. संपूर्ण तळीये गाव या दरडीत गाढले गेले. तळीयेच्या दुर्घटनेत जवळपास ४२ कुटुंब उद्धवस्त झाली. या सर्वांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरे बांधून देण्यात येणार आहेत.

- Advertisement -

राणेंनी तळीये दुर्घटनाग्रस्तांना धीर दिला

नारायण राणे आज सकाळीच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासोबत कोकण दौऱ्यांला रवाना झाले होते. त्यांनी तळीये गावातील परिस्थितीची पाहणी केली. दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात येईल, राज्य आणि केंद्र सरकार पुन्हा एकदा तळीये गावाच्या ठिकाणी वसाहती बांधतील, असे आश्वासन नारायण राणे यांनी वेळी दिले. पुढे राणे म्हणाले, तळीये दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येतील. तुमची घरे तुम्हाला परत मिळतील. एकच गोष्ट आम्हाला तुम्हाला परत करता येणार नाही ती म्हणजे या दुर्घटनेत मरण पावलेली लोक. जे लोक जिवंत आहेत त्यांना आम्ही दिलासा देऊ शकतो याची मला खात्री आहे, असे म्हणत राणेंनी तळीये दुर्घटनाग्रस्तांना धीर दिला.

दिल्लीत गेल्यानंतर पंतप्रधानांना अहवाल देईन

कोकणात झालेल्या नुकसानीची सर्व माहिती मी दिल्लीत गेल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देईन. मी स्वत: त्यांनी सर्व अहवाल सादर करेन आणि निश्चित कोकणवासियांनी मदत केली जाईल, असा विश्वास देखील नारायण राणे यांनी यावेळी दिला.

- Advertisement -

तळीये दुर्घटनेत स्थानिकांना मदत मिळावी यासाठी अधिकारी, NDRF चे पथक चांगले काम करत आहेत. आमचं गावातचं पुर्नवसन करा अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. गावकऱ्यांच्या मागणीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांना गावकऱ्यांचे पुनर्वसन करण्याच्या सुचना देण्यात आल्या असून नागरिक ज्या ठिकाणी सुचवतील त्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल व त्यांना सर्व नागरी सुविधा मिळतील, असे नारायण राणे यांनी म्हटले.


हेही वाचा – Taliye Landslide: तळीये दुर्घटनेतील प्रत्यक्षदर्शी आणि पीडित व्यक्तींनी कथन केले भयाण अनुभव

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -