घरताज्या घडामोडीरमेश लटके आज असते तर शिंदे गटात असते, नारायण राणेंचं मोठं वक्तव्य

रमेश लटके आज असते तर शिंदे गटात असते, नारायण राणेंचं मोठं वक्तव्य

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच शिवसेनेचे दिवंगत नेते रमेश लटके यांच्याबाबत मोेठं वक्तव्यं केलं आहे. रमेश लटके आज असते तर शिंदे गटात असते, असं नारायण राणे म्हणाले.

आम्ही नक्कीच जिंकू…

- Advertisement -

मुंबईमधील अंधेरीच्या पोट निवडणुकीत मुरजी पटेल यांनी अर्ज भरला आहे. त्यांचा विजय नक्की होईल. आम्ही नक्कीच जिंकू, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला. दक्षिण मुंबईत भाजपचाच खासदार असणार आहे. मुंबईत एकही खासदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा येणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ.

राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

- Advertisement -

वरळी मुंबईत येथे आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजप आणि शिंदे गटाचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे यांचं आता काहीही राहिलं नाही. आता राज्य गेलं, मुंबई गेली आता वरळी राहिली का?, नंतर मातोश्री येईल, असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

सकाळी बाबुलनाथचं दर्शन घेऊन मी प्रचाराला सुरवात केली आहे. मी एकाच सांगतो दक्षिण गोवा आणि दक्षिण मुंबई माझ्याकडे आहे. मी तिकडेही जाऊन आलो आणि इकडे मुंबईतही प्रचार सुरु आहे. मी दोन्ही मतदार संघ निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, असं राणे म्हणाले.

लोकसभा प्रवास ही भाजपाची नवीन संकल्पना

लोकसभा प्रवास ही भाजपाची नवीन संकल्पना आहे. ही आम्हा सर्व केंद्रीय मंत्र्यांना ज्या मतदार संघात २०१९ मध्ये भाजपचा पराभव झाला. अशा देशातील १४४ जागा आहेत. त्या जागांवर केंद्रीय मंत्र्यांना प्रत्येकी २ मतदारसंघ देऊन या निवडणुका २०२४ ला तिथला खासदार भाजपाचा जिंकून यावा, याची पूर्वतयारी करण्यासाठी हा प्रवास आहे. हा प्रवास करत मी दक्षिण गोव्यावरुन आज दक्षिण मुंबईत दुसरा दिवस आहे, असं नारायण राणे म्हणाले.


हेही वाचा : September WPI: घाऊक महागाई दरात घट, दिवाळीपूर्वीच सर्वसामान्यांना मोठा दिलासा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -