घरताज्या घडामोडीनारायण राणेंचे मंत्रिपद दोन महिन्यात जाणार; वैभव नाईकांनी सांगितले 'हे' कारण

नारायण राणेंचे मंत्रिपद दोन महिन्यात जाणार; वैभव नाईकांनी सांगितले ‘हे’ कारण

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मंत्रिपद दोन महिन्यात जाणार असल्याचा गौप्यस्फोट कोकणातील आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. विशेष म्हणजे वैभव नाईक यांनी गौप्यस्फोट करताना त्यामागचे कारणही दिले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मंत्रिपद दोन महिन्यात जाणार असल्याचा गौप्यस्फोट कोकणातील आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. विशेष म्हणजे वैभव नाईक यांनी गौप्यस्फोट करताना त्यामागचे कारणही दिले आहे. त्यामुळे आता दोन महिन्यात नारायण राणेंचे मंत्रिपद जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (narayan rane will leave from union ministry in next two months says mla vaibhav naik)

नेमके काय म्हणाले वैभव नाईक?

- Advertisement -

कणकवलीत पत्रकार परिषदेत बोलत असताना आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. “आतापर्यंत इतरांचे राजकीय अस्तित्व ठरविणाऱ्या राणेंचं राजकीय अस्तित्व आता भाजप ठरविणार आहे. भाजपला राणेंची राजकीयदृष्टया गरज नाही त्यामुळे राणेंना राजीनामा द्यावा लागणार असे भाकीत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले आहे”, असे वैभव नाईक म्हणाले.

नारायण राणे यांच्यावर निशाणा साधताना वैभव नाईक यांनी नितेश राणे यांच्यावरही टीका केली. “नितेश राणे यांनी अगोदर आपल्या वडिलांना विचारावे की त्यांना इडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी पक्ष का बदलला? त्यांना आलेल्या ईडीच्या नोटीसचे काय झाले. वडिलांनी नेमका कोणता समझोता केला? हे अगोदर जनतेसमोर आणावे आणि मग इतरांना उपदेश करावा”, अशा शब्दात वैभव नाईक यांनी नितेश राणेंवर निशाणा साधला.

- Advertisement -

कोकणात ठाकरे गट आणि राणे कुटुंबीयांकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. दोन्हीकडून एकमेकांचे वाभाडे काढले जात आहेत. कधी नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत तर कधी वैभव नाईक विरुद्ध नितेश राणे यांच्यातील शाब्दिक चकमक रंगत असते. त्यामुळे कोकणातील राजकारण सतत तापलेले असते.


हेही वाचा – ‘राहुल गांधी विदेशी महिलेचा मुलगा, ते देशभक्त असूच शकत नाही’; भाजपाच्या महिला खासदाराचे विधान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -