घरताज्या घडामोडीNashik Oxygen Tank Gas leakage: नाशिकमधील भाजपचे ३ आमदार, महापौर फरार झाले...

Nashik Oxygen Tank Gas leakage: नाशिकमधील भाजपचे ३ आमदार, महापौर फरार झाले काय? सचिन सावंत यांचा सवाल

Subscribe

भाजप नेत्यांच मानसिक संतुलन बिघडलंय का?

नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ऑक्सिजन टाकी लिकेज झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. रुग्णालयातील २२ रुग्ण ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्यामुळे तडफडून मृत्युमुखी पडले आहेत. यावर राज्यासह देशातील सर्वच नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या दुर्घटनेवरुन भाजपवर टीका केली आहे. नाशिकमधील घटना दुर्दैवी असून भाजपने या घटनेची जबाबदारी स्विकारायला हवी असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. नाशिक रुग्णालयातील ऑक्सिजन लिकेज घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जावी अशी मागणी सर्वच नेत्यांनी केली आहे.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी नाशिक झाकीर हुसेन रुग्णालयातील गॅस गळतीवरुन भाजवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दुर्घटना घडलेले रुग्णालय हे महापालिकेचं आहे. तर ही महापालिका भाजपच्या ताब्यात असल्यामुळे भाजपने या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तसेच भाजपचे ३ आमदार आणि महापौर कुठे आहेत? ते फरार झाले का? असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. नाशिक दुर्घटनेची चौकशी करण्याची मागणीही काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

नाशिकमध्ये झाकील हुसेन रुग्णालयात घडलेली दुर्घटना दुर्दैवी आहे. महाराष्ट्रातपणे अशा प्रकारची घटना घडते हे अतिशय लाजिरवाणे आहे. म्हणून घटनेच्या मुळाशी पोहचण्यासाठी राज्य सरकारने चौकशी करावी, जो दोषी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु अश्चर्याची बाब ही आहे की, भाजप नेते राज्य सरकारवरला जबाबदार धरत आहे. ऑक्सिजन टाकीच काम नुकतेच करण्यात आले होते. ते कामाचं टेंडरही महापालिकेने काढले होते. ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी समितीही महापालिकेने केली होती. अशा वेळी राज्य सरकार या घटनेला जबाबदार कस असू शकेल असा प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. तर राज्य सरकारवर आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांच मानसिक संतुलन बिघडलंय का शंका उपस्थित होत असल्याचे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -