घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक विभागाचा सात वर्षातील निच्चांक

नाशिक विभागाचा सात वर्षातील निच्चांक

Subscribe

दहावी निकाल: 2012 नंतर प्रथमच निकाल 77 टक्क्यांपर्यंत घसरला

अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागून असलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी (दि.8) ऑनलाईन स्वरूपात जाहीर झाला. राज्याच्या निकालात यंदा सरासरी 11 टक्के घसरण झाली आहे. तसेच नाशिक विभागाने गेल्या सात वर्षातील निच्चांक गाठला असून, सन 2012 नंतर यंदा प्रथमच विभागाचा निकाल 80 टक्क्यांपेक्षा कमी लागला आहे.

राज्यात कोकण विभागाने पहिला क्रमांक पटकावत निकालात आघाडी घेतल्याचे दिसून येते. नाशिक विभाग 77.56 टक्के गुणांसह चौथ्या स्थानावर फेकला गेला असून, विभागाच्या निकालात तब्बल दहा टक्के घसरण झाली आहे. गेल्या सात वर्षांचे निकाल बघता 2012 नंतर प्रथमच नाशिकचा निकाल इतका घरसल्याचे दिसते. दहावीच्या निकालास 2015 पासून उतरण लागली. गेल्या पाच वर्षात हा आकडा 15 टक्क्यांनी घसरला आहे. वर्षानुवर्ष घटणारा निकाल व गैरमार्गातील वाढते प्रकार यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- Advertisement -

नाशिक चौथ्या स्थानी

राज्यातील नऊ विभागांमध्ये कोकण विभागाने 88.38 टक्के गुणांसह निकालात बाजी मारली. तसेच कोल्हापूर विभाग 86.58 टक्के गुणांसह द्वितीय, पुणे 82.48 टक्के गुणांसह तिसर्‍या तर, नाशिक 77.58 टक्के गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला. गेल्या वर्षीच्या निकालात नाशिक विभाग राज्यात सहाव्या स्थानी होता. त्यामुळे निकालात दहा टक्के घसरण झालेली दिसत असली तरी, राज्याच्या तुलनेत निकाल उंचावला आहे.

वर्षनिहाय निकाल

2019: 77.58 टक्के
2018: 87.42 टक्के
2017: 87.76 टक्के
2016: 89.61 टक्के
2015: 92.16 टक्के
2014: 89.15 टक्के
2013: 83.86 टक्के
2012: 77.07 टक्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -