घरमहाराष्ट्रनाशिककळवणसाठी चणकापूरमधून २.२५ दशलक्ष घनमीटर पाणी

कळवणसाठी चणकापूरमधून २.२५ दशलक्ष घनमीटर पाणी

Subscribe

भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेऊन घेतला निर्णय

कळवण नगरपंचायतीच्या पाणीपुरवठ्यासाठी जलसंपदा विभागाने १.३९ दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर केले आहे. २०५१ ची लोकसंख्या गृहीत धरून या पाण्याचे चणकापूर धरणात आरक्षण देण्यात आले आहे. यापूर्वी कळवणकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ०.८६ दशलक्ष घनमीटर पाणी चणकापूरमधून मंजूर करण्यात आले आहे. पूर्वीची आणि आजची मंजुरी लक्षात घेता, चणकापूरमधून कळवण नगरपंचायतीसाठी आता २.२५ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार असल्याने भविष्यात कळवण शहराला पाणी टंचाई पासून मुक्ती मिळणार आहे.

शहराचा वाढत्या विस्तारामुळे लोकसंख्या देखील वाढत असल्यामुळे उपलब्ध साधनातून भविष्यात कळवण शहराला पाणी टंचाईला सामोरे जाण्याची भीती लक्षात घेऊन आमदार नितीन पवार, कळवण नगरपंचायत गटनेते कौतिक पगार यांनी जलसंपदा विभागाकडून कळवण शहरासाठी २.२५ दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर करुन घेतल्यामुळे भविष्यात पाणी टंचाई निर्माण होणार नसल्याने कळवणकरांना दिलासा मिळाला आहे. शिवाजीनगर, गणेशनगर, संभाजीनगर, रामनगर,गांधी चौक, फुलाबाई चौक, नेहरु चौक, मेनरोड, सावरकर चौक, मोहल्ला, ओतूर रोड आदी नगरपंचायतच्या १७ प्रभागात कळवण शहर विस्तारले आहे. ग्रामपंचायत असताना असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून शहरातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याची सोडवणूक नगरपंचायतच्या माध्यमातून सध्यास्थितीत केली जाते. सध्या कळवण नगरपंचायतच्या पाणी पुरवठ्यासाठी जलसंपदा विभागाने चणकापूर धरणातून ०.८६ दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर आहे.

- Advertisement -

अर्जुन (नकट्या) बंधार्‍याचे विघ्न मिटवण्यात तत्कालीन आमदार स्व.ए.टी पवार, तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य, आमदार नितीन पवार, तत्कालीन पंचायत समिती सभापती गटनेते कौतिक पगार यांना यश आल्यामुळे चणकापूरचे पाण्याचे आवर्तन मालेगावकरांसाठी सोडल्याने गिरणा नदीपात्रातील नकट्या (अर्जुन) बंधारा पाण्याने ओसंडून वाहत असल्याने नगरपंचायतच्या पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळतो. आज जिल्ह्यातील इतर शहरी व ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असून २ ते ३ दिवसानंतर पिण्याचे पाणी उपलब्ध होते.कळवण शहर व तालुक्यात मात्र मुबलक पाणी असल्यामुळे परिस्थिती ही इतरांपेक्षा वेगळी आहे. कळवण शहराची वाढत्या लोकसंख्येचा विचार करून सध्या अस्तित्वात असलेली पाणी पुरवठा योजना खूपच अपुरी पडणार असल्याने चणकापूर धरणातून कळवण शहराला वाढीव पाणी मंजूर करण्याचा प्रस्ताव आमदार नितीन पवार,नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार यांनी जलसंपदा विभागाकडे सादर केला.जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी खास बाब म्हणून प्रस्तावाला मंजुरी दिल्याने भविष्यात कळवणला पाणी टंचाई निर्माण होणार नसल्याने दिलासा मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -