घरमहाराष्ट्रनाशिकलम्पी आजारातून २१४ जनावरे बचावली

लम्पी आजारातून २१४ जनावरे बचावली

Subscribe

जिल्ह्यात लम्पी या संसर्गजन्य आजारामुळे आठ जनावरांचा मृत्यू झालेला असला तरी 214 जनावरे ठणठणीत झाली आहेत.

नाशिक :  जिल्ह्यात लम्पी या संसर्गजन्य आजारामुळे आठ जनावरांचा मृत्यू झालेला असला तरी २१४ जनावरे ठणठणीत झाली आहेत. सद्यस्थितीला १७ जनावरांना लागण झालेले असली तरी ७५ टक्के लसीकरणामुळे जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे. लम्पीचा प्रादुर्भाव वाढताच जिल्हा पशुसंवर्धन विभागाने लसीकरण सुरु केले. आतापर्यंत जिल्हयात पाच लाख ५५ हजार २७० जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणासाठी पशुसवंर्धन विभागास सद्यपरिस्थितीत सव्वासहा लाख लसींचा साठा उपलब्ध आहे. २४४ पशु वैद्यकीय दावखान्यांमध्ये लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११ तालुक्यांमध्ये ३५० बाधीत क्षेत्र असून यातील २७० जनावरांना लम्पीची बाधा झाली आहे. त्यातून १५० हून अधिक जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. लम्पीची बाधा झालेली सर्वाधिक जनावरे सिन्नर तालुक्यात आहे.

जिल्ह्यात 7 प्रस्ताव मान्य

लम्पीमुळे गायीचा मृत्यू झालेल्या व्यक्तींना ३० हजार तर बैलाचा मृत्यू झाल्यास २५ हजार रुपये दिले जातात. यात चंद्रकांत आडोळे (बोरटेंभा, इगतपुरी) यांच्या बैलाचा मृत्यू झाला असून त्यांना २५ हजारांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. विजय दत्तु जाधव (घोटी, इगतपुरी) यांच्या गाईचा मृत्यू झाला असून त्यांना ३० हजारांचे तर, वाळीबा बन्सी जाधव (पाडळी, सिन्नर) व रामनाथ खंडू कराड (पाटोळे, सिन्नर) यांचे वासरू मृत्यू असून त्यांना प्रत्येकी १६ हजारांचे अनुदान प्राप्त झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -