घरमहाराष्ट्रनाशिकजिल्ह्यातील २४०० विद्यार्थिनींना मिळणार सायकल

जिल्ह्यातील २४०० विद्यार्थिनींना मिळणार सायकल

Subscribe

नाशिक : राज्य शासनाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल दिली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, बागलाण व नांदगाव तालुक्यातील प्रत्येकी 400 विद्यार्थिनींना सायकल खरेदीसाठी पाच हजार रुपयांचे अनुदान थेट बँक खात्यावर वर्ग केले जाणार आहे.

कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे शाळेत जाण्यासाठी सायकल देण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. कोरोना संपल्यानंतर आता राज्य शासनाच्या नियोजन विभागाने 16 फेब्रुवारी 2022 रोजी सायकल वाटपाचे आदेश दिले आहेत. इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या परंतु, शाळेपासून पाच किलो मिटर अंतरावर राहणार्‍या गरजू मुलींना प्राधान्याने सायकलींचे वाटप केले जाणार आहे. लाभार्थ्यांना प्रत्यक्ष सायकल वाटप केले जाणार नसले तरी सायकल खरेदीसाठी 5 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट अनुदान देण्याची प्रक्रिया माध्यमिक शिक्षण विभागाने सुरु केली आहे. जिल्हा नियोजन अधिकार्‍यांकडे निधीची मागणी केली असून, त्यांनी मंजूरी दिल्यानंतर निधी वितरीत केला जाणार आहे.

असे मिळेल अनुदान
  1. पहिल्या टप्प्यात गरजू मुलींच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात साडेतीन हजार रुपये पाठवले जातील
  2. दुसर्‍या टप्प्यात त्यांनी सायकल खरेदी करावी
  3. सायकल खरेदी पावती दाखवल्यानंतर उर्वरित 1500 रुपये बँक खात्यावर जमा होतील
  4. या योजनेत शासकीय शाळा, जिल्हा परिषद शाळा, शासकीय अनुदानित शाळा, आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ घेता येईल
  5. डोंगराळ व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू आहे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -