घरमहाराष्ट्रनाशिक३१६ कोटींच्या करंजवण पाणीपुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश, कामाचा लवकरच शुभारंभ

३१६ कोटींच्या करंजवण पाणीपुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश, कामाचा लवकरच शुभारंभ

Subscribe

मनमाडकरांची पाणी टंचाईतून होणार सुटका

मनमाड : पाणी टंचाईची कायमच टांगती तलवार असलेल्या मनमाडकरांची आता पाणी टंचाईतून कायमची सुटका होणार आहे. आमदार सुहास कांदे यांच्या अथक प्रयत्नातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणीपुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) काढण्यात आल्याने लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या चार दशकांपासून असलेले पाणी टंचाईचे ग्रहण अखेर सुटणार आहे. या योजनेमुळे मनमाड शहरातील सव्वालाख नागरिकांना नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे.

वर्षानुवर्षांपासून पाणी टंचाईच्या चक्रव्यूहात अडलेल्या मनमाडवासियांना बाहेर काढण्यासाठी आमदार सुहास कांदे प्रयत्नशील आहेत. ३१६ कोटींच्या या योजनेसोबत २३५ कोटींच्या नांदगाव मतदार संघातील ७८ खेडी पाणीपुरवठा योजनेच्या कामाची देखील वर्क ऑर्डरही यावेळी देण्यात आली. राज्य शासनाने मनमाडसह नांदगाव मतदार संघासाठी तब्बल ५५१  कोटीच्या पाणी पुरवठा केवळ मंजूरच केल्या नाही तर त्यासाठी निधीची तरतूदही केली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हस्ते ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली असून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह इतर सर्व मंत्री, अधिकार्‍यांचा ऋणी असल्याचे मत आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केले. कामाची वर्क ऑर्डर मिळाल्यामुळे आता काही दिवसांत मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते योजनेच्या कामाचा शुभारंभ केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही शहराचा सर्वागीण विकास करण्यासाठी पाणी, वीज, चांगले रस्ते, दळणवळणाची साधने, मनुष्यबळ, जमीन आणि राजकीय इच्छाशक्ती ही सात घटक महत्वाचे मानले जाते. विकासासाठी महत्वपूर्ण मानल्या जाणार्‍या या सात वाटाच्या बळावर छोट्या-मोठ्या गावापासून शहरापर्यंत अनेकांनी प्रगती करून विकास साधला आहे.

- Advertisement -

मात्र नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त दळणवळणाची साधने, मनुष्यबळ, मुबलक जमीन, वीज आदी गोष्ठी असताना केवळ भीषण पाणी टंचाईमुळे शहर विकासापासून कोसो दूर आहे. वर्षाच्या बारा महिने नागरिकांना एक हंडा पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र गेल्या ३५ ते ४०  वर्षांपासून शहरातील आहे. इतर शहरांचा झपाट्याने विकास झालेला असताना मात्र मनमाडचा विकास होण्याऐवजी हे शहर भकास होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. मात्र आता विकासाचा हा बॅकलॉक भरून काढणार असल्याचे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला असून यावेळी पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, संग्राम बच्छाव महेंद्र दुकळे, राजाभाऊ भाबड, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, पंकज निकम, शहरप्रमुख मयूर बोरसे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहर प्रमुख जयकुमार फुलवानी, युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान, सुरेश शेलार, ज्ञानेश्वर कांदे, धनंजय कांदे, महावीर ललवाणी, भरत पवार, आबा देवरे, नारायण पवार, एकनाथ बोडके, महेश बोराडे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

विकासाला मिळणार चालना

उद्योग नसल्याने बेरोजगारांच्या हाताला काम धंदा नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक तरुणांना तुटपुंज्या पगारावर बाहेर गावी जावे लागते.उच्च शिक्षण घेवून देखील नोकरी,कामधंदा मिळत नसल्यामुळे अनेक तरुण नैराश्यपोटी वेगवेगळ्या व्यसनाच्या आहारी गेले तर काहींनी गुन्हेगारीचा मार्ग देखील अवलंबला आहे पाणी टंचाई सोबत चांगल्या आरोग्या व्यवस्था आणि उच्च शिक्षणाच्या सोयी-सुविधा नाही, वाढत चाललेली गुंडगिरी त्याला मिळणारे राजकीय पाठबळ आदिला कंटाळून हजारो नागरिकांनी या शहराला कायमचा राम-राम ठोकून इतर ठिकाणी स्थलांतर केले आहे. मात्र आता मतदारसंघातील पाणीपुरवठा योजना वेळेत मार्गी लागणार असल्याने विकासाची प्रक्रिया देखील गतीमान होईल असा विश्वास आमदार कांदे यांनी व्यक्त केला.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -