घरमहाराष्ट्रनाशिकतंत्रप्रदर्शनात सिन्नर मविप्र आयटीआयला बक्षीस

तंत्रप्रदर्शनात सिन्नर मविप्र आयटीआयला बक्षीस

Subscribe

अ‍ॅक्सिडेंट व्हेईकल कंट्रोल प्रकल्प ठरला सर्वोत्तम

नाशिक : सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण, संस्थेमध्ये जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, नाशिक यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात सिन्नरच्या मविप्र आयटीआयतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या व्हेईकल अ‍ॅक्सिडेंट कंट्रोल (अँटी स्लिप प्रोटेक्शन फॉर ड्रायव्हर) या प्रकल्पास बक्षीस मिळाले.

जिल्ह्यातील २६ संस्थांनी विविध संशोधनपर ७८ प्रकल्प सादर करण्यात आले होते. मविप्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिन्नर संस्थेच्या रोशन वारुंगसे, दिवेश काकड, ऋषिकेश आवारे, सुरज साबळे, जाईद पठाण व सौरभ दराडे यांनी बनविलेल्या व्हेईकल अ‍ॅक्सिडेंट कंट्रोल (अँटी स्लिप प्रोटेक्शन फॉर ड्रायव्हर) या प्रकल्पाला बक्षीस मिळाले. यावेळी आय.एम. काकड जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, प्राचार्य रवींद्र मुंडासे उपसंचालक, अनिसा तडवी सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नाशिक यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

- Advertisement -

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मविप्रचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापतीडी.बी. मोगल, चिटणीसदिलीप दळवी, सिन्नर तालुका संचालककृष्णाजी भगत, शिक्षणाधिकारी प्रा.डॉ.विलास देशमुख यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी आयटीआयचे प्राचार्य आर.बी. पाटील, निदेशक पी.के.बोरसे, के.पी.मुळक, सी.पी. शिर्पे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव : भगत

तसेच तंत्रप्रदर्शनात सहभाग व बक्षीस मिळालेल्या विद्यार्थी व निदेशकांना मविप्र सिन्नर तालुका संचालककृष्णाजी भगत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी अशा प्रकारच्या तंत्रप्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पना-शक्तीला वाव मिळत असल्याचे सांगितले.

- Advertisement -

अपघात समस्येवर उपाय

बर्‍याच वेळा रात्रीच्या प्रवासात चालकाला डुलकी येते. आणि अपघात होऊन जीव गमवावा लागण्याच्या घटना नेहमीच कानावर येतात. परंतु आता प्रोटेक्शन सिस्टीम या यंत्राच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी होत असलेले अपघात टाळणे शक्य होणार आहे. या खास यंत्राद्वारे आपले डोळे जर 30ओखाली आले तर सेन्सरद्वारे ते सेन्स होते. आणि पार्किंग अलार्म सिग्नल देतो. हा प्रोजेक्ट एलडीआर बेस (लाईट डिपेंडंट रजिस्टर) स्विचवर आधारित आहे. हा एक प्रकारचा सेन्सर आहे. जो श्वसन आणि शरीराची हालचाल मोजण्यासाठी बायो मोशन सेन्सर वापरून आपल्या झोपेचा लांबूनच मागोवा घेतो. आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी ड्रायव्हरला झोप आली असता अलार्म वाजतो. यासोबत गाडी साईड पार्किंगसाठी मागील व्हेईकलला पार्किंग इंडिकेटर देतो.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -