घरताज्या घडामोडीगुरुवारी दिवसभरात २० करोना पॉझिटिव्ह; नाशिक जिल्हा ५२१ वर

गुरुवारी दिवसभरात २० करोना पॉझिटिव्ह; नाशिक जिल्हा ५२१ वर

Subscribe

मालेगावसह नाशिक जिल्ह्यात करोनाचे थैमान सुरुच असून, गुरुवारी (दि.७) सायंकाळपर्यंत त्यात आणखी २० करोनाबाधितांची भर पडली. जिल्हा प्रशासनाला गुरुवारी दुपारपर्यंत प्राप्त रिपोर्टपैकी १४१ निगेटिव्ह, तर आठ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यात मालेगावचे चार, येवला दोन, सिन्नर व नाशिक शहरातील समतानगरमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. नाशिक शहरातील रुग्णांची संख्या २६ झाली असून जिल्ह्यात एकूण ५२१ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.

मालेगावसह नाशिक जिल्ह्यात गुरुवारी पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जिल्हा रुग्णालयात ७२, नाशिक महापालिका रुग्णालय ४९, मालेगाव रुग्णालय २९६ आणि नाशिक ग्रामीण रुग्णालयात ३९ असे एकूण ४५६ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, नाशिक ग्रामीण 56, नाशिक महापालिका ४८, मालेगाव ४९२ व जिल्ह्याबाहेरील चार असे एकूण नाशिक जिल्ह्यातील एकूण ६०० अहवाल प्रलंबित आहेत.

- Advertisement -

तीन करोना संशयितांचा मृत्यू

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असतानाही नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल तीन करोना संशयित रुग्णांचा बुधवारी (दि.६) उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. तिघांचेही अहवाल प्रलंबित आहेत. यातील एक रुग्ण सायंकाळी दाखल करण्यात आल्यानंतर मृत्यू झाला. मृतांमध्ये म्हसरुळमधील महिला, सातपूरमधील पुरुष व आझमगढ येथील व सध्या बाजार समितीमधील असलेल्या एका ट्रकचालकाचा समावेश आहे.

समतानगर प्रतिबंधित क्षेत्र

- Advertisement -

टाकळीरोडवरील समतानगरमध्ये गुरुवारी करोनाबाधित रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेने समतानगर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. समतानगरमधील रुग्ण सध्या स्व. वसंतराव पवार मेडीकल कॉलेजमध्ये दाखल आहे.

गुरुवारी दाखल रुग्ण

जिल्हा रुग्णालय १०
नाशिक ग्रामीण 99
मालेगाव रुग्णालय ४०

नाशिक करोना अहवाल

पॉझिटिव्ह रुग्ण – ५21
मालेगाव – ४20 (मृत १८, बरे ४१)
नाशिक शहर – २6 (मृत १, बरे ३)
नाशिक ग्रामीण -५7 (बरे २)
जिल्ह्याबाहेरील – १8
निगेटिव्ह रुग्ण -3,352
प्रलंबित अहवाल – ६००

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -