घरमहाराष्ट्रनाशिकजैन मंदिरात दागिन्यांसह 65 हजारांची चोरी

जैन मंदिरात दागिन्यांसह 65 हजारांची चोरी

Subscribe

गस्त वाढवण्याची मागणी

चांदवड :  येथील वरचेगावातील खंडेलवाल दिगंबर जैन मंदिरातून चांदीचे दागिने, पंचमुखी छत्रपाल यांचे चांदीचे मुकूट व रोख रुपये असा एकूण ६५ हजाराची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची फिर्याद मंदिराचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेंद्र धनालाल कासलीवाल यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली.

दरम्यान, चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संस्थेच्या आवारात असलेल्या मेघपार्श्वनाथ मंदिर, गुजराथ गल्लीतील श्री महावीर स्वामी श्वेतांबर जैन मंदिर तसेच सोमवारपेठेतील श्री पगडी गणपती मंदिर (मातीचा गणपती), फुलेनगर येथील विठ्ठल मंदिर अशा विविध मंदिरांत अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयन केला. मात्र इतर मंदिरांतून काही अल्प प्रमाणेत चोरी झाली असल्याचे सांगण्यात आले. अ‍ॅड. नरेंद्र कासलीवाल यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ६ रोजी सकाळी सव्वासहाच्या सुमारास दर्शन अजमेरा यांनी भ्रमणध्वनीद्वारे कळविले की, खंडेलवाल दिगंबर मंदिराच्या दरवाजाचे कुलूप कोणीतरी उघडलेले होते. दान पेटी फोडलेली होती.

- Advertisement -

मंदिरात पाहणी केली असता व ट्रस्टी प्रविण कासलीवाल, मांगीलाल कासलीवाल, अंकुर राजेंद्र कासलीवाल, योगेश अजमेरा व जैन समाजाचे सर्व बांधव घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली असता मुख्य मूर्तीच्या डोक्यावरील तीन थर असलेले चांदीचे एक किलो वजनाचे छत्र किंमत रुपये पन्नास हजार, मुख्य मूर्तीचे समोर ठेवलेले चांदीची फुले पाच हजार रुपये किंमतीचे, पंचमुखी छत्रपालास मुकुट चांदीचा सात हजार रुपये किंमतीचा, तीन हजार रुपयांच्या नोटा व चिल्लर असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरुन नेला अशी फिर्याद अ‍ॅड. नरेंद्र कासलीवाल यांनी दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर व उपपोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी हे करीत आहेत. दरम्यान ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -