घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअबब ! पहिने घाटात ९ फूट, १७ किलोचा अजगर

अबब ! पहिने घाटात ९ फूट, १७ किलोचा अजगर

Subscribe

नाशिक : विपूल वनसंपदा आणि जलसाठ्यांमुळे पर्यटकांचे केंद्र बनलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने घाट परिसरात सर्पमित्र ज्ञानेश्वर सोनार यांनी तब्बल ९ फूट लांबीचा आणि तब्बल १७ किलोचा अजगर पकडला. गेल्या काही महिन्यातील हा तिसरा अजगर (इंडियन रॉक पायथन) आहे. जंगलसंपदेवर माणसांचे अतिक्रमण वाढल्याने पशुपक्ष्यांचे स्थलांतर सुरू झाल्याचे यानिमित्ताने दिसू लागले आहे.

पहिने घाटातील डगळे बाबा यांच्या हॉटेलजवळ सर्पमित्र सोनार यांनी हा अजगर पकडला. सुमारे साडेआठ ते नऊ फूट लांबीचा हा अजगर होता. त्र्यंबकेश्वर परिसरात आता माणसांचे अतिक्रमण वाढल्याने निसर्गातील प्राणी, पक्षी आणि साप यांच्या अधिवासावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे.

- Advertisement -

२५ सप्टेंबरला रात्री १० वाजता सत्यप्रिय शुक्ल यांचा ज्ञानेश्वर सोनार यांना हॉटेलमध्ये साप दिसल्याचा मेसेज आला. सोनार तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी त्याला सुरक्षितपणे पकडून एका पोत्यामध्ये टाकले. मित्र राजू माहुलकर, सागर कडलग यांच्या मदतीने पकडला. त्यावेळी सत्यप्रिय शुक्ल, भाऊराव डगळे, रामदास डगळे, सुनील डागळे उपस्थित होते. सर्पतज्ज्ञ मनीष गोडबोले यांच्यामार्फत त्र्यंबकेश्वर वनविभागात या अजगराची नोंद करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी नाशिकचे सर्परक्षक राकेश मराठे, राजू पठाण, छायाचित्रकार विनोद गवई, वन्यजीवप्रेमी अनघा निमकर उपस्थित होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -