Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक लस घेताच व्यावसायिकाच्या अंगात संचारले चुंबकत्व

लस घेताच व्यावसायिकाच्या अंगात संचारले चुंबकत्व

लोखंडी वस्तूंसह स्टिलचे कॉईनही लस घेतलेल्या जागेवर चिकटू लागले

Related Story

- Advertisement -

कोरोना संसर्ग प्रतिबंधक लस घेतल्यानंतर दुसर्‍याच दिवशी नवीन नाशिक भागातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या हाताला लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मानवी शरीराची रचना बघता वैद्यकीयदृष्ट्या चुंबकत्व येणे अशक्य मानले जात असले तरीही, अनेकांनी प्रत्यक्ष जाऊन या प्रकाराची खात्री केली आहे. त्यामुळे विज्ञानापुढे एकप्रकारे हे आव्हानच उभे ठाकले आहे.

नवीन नाशिकमधील शिवाजी चौकात राहणार्‍या अरविंद सोनार या ७२ वर्षीय व्यावसायिकाने खासगी हॉस्पिटलमधून २ जून रोजी कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस घेतला. त्यानंतर त्यांना चुंबकत्वाची अनुभूती येऊ लागली. मुलगा जयंत याने खात्री करण्यासाठी वडिलांच्या हाताला नाणी, स्टील आणि लोखंडाच्या वस्तू लावून पाहिल्या. लस उजव्या हाताला घेतलेली असल्याने कोपरापासून ते खांद्यापर्यंतच्या भागात या वस्तू चिटकत असल्याचे निदर्शनास आले.

घाम नाही, चुंबकत्वच

हाताला घाम येत असल्याने या वस्तू चिटकत असतील, अशी शंका सोनार यांच्या कुटुंबियांना आली. त्यामुळे अरविंद यांनी हात धुवून, स्वच्छ पुसून प्रयत्न केला. त्यानंतरही चमचे, विविध नाणी, उचटने अशा लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचे दिसून आले. यासंदर्भात ‘आपलं महानगर’च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष जाऊन खात्री केली तेव्हाही यात तथ्य आढळून आले.

Doctor Lakshmikant Pathakवैद्यकीयदृष्ट्या मानवी शरीरात चुंबकत्व निर्माण होणे अशक्य असते. मात्र, अपवादात्मक परिस्थितीत हिमोग्लोबिनचे प्रमाण उच्चतम पातळीवर पोहोचून त्यातील लोहकणांची संख्या त्याच प्रमाणात वाढून चुंबकत्वाचे गुणधर्म उतरले तरच हे शक्य होते. लसीमुळे हे झाले असावे, असे म्हणता येणार नाही.

                                                                                                                     – डॉ. लक्ष्मीकांत पाठक

- Advertisement -