पंतप्रधान मोदींच्या सुरक्षिततेसाठी भाजपचा महामृत्युंजय यज्ञ

रामकुंड येथील श्री बाणेश्वर मंदिरात मोदींच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना

नाशिक : पंजाब दौर्‍यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ नये, तसेच त्यांना दिर्घायुष्य लाभावे, यासाठी नाशिक भाजपच्या वतीने महामृत्युंजय जप करण्यात आला.

रामकुंड येथील श्री बाणेश्वर मंदिरात भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले, शहराध्यक्ष गिरीश पालवे आदींच्या उपस्थितीत हा जप करण्यात आला. या कार्यक्रमात महंत भक्तिचरणदास महाराज, पुरोहित संघाचे सतिश शुक्ल, सरचिटणीस सुनील केदार, मेघना आंबेकर, चंद्रशेखर पंचाक्षरी, प्रतिक शुक्ल, सुजाता करजगीकर, निखिल आंबेकर आदी सहभागी झाले होते.