घरमहाराष्ट्रनाशिकअफगाणच्या रुग्णांवर नाशिकमध्ये उपचार

अफगाणच्या रुग्णांवर नाशिकमध्ये उपचार

Subscribe

७० ते ७५ टक्के कर्करोगग्रस्तांवर होत आहे भारतात उपचार

अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रभावी उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तानच्या संसदेचे वैद्यकीय सल्लागार आणि फिजिशियन डॉ. खालीद अहमद तसेच सहायक बेदार खान यांनी रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयात उपलब्ध सुविधांचे त्यांनी कौतुक केले. अफगाणिस्तानच्या कर्करोगग्रस्तांवर उपचारासाठी व रुग्ण तपासणी शिबिरांसाठी सकारात्मक चर्चा झाली.

सेंटरचे एमडी व ऑन्कॉलॉजी अ‍ॅण्ड रोबोटिक सर्जन प्रा.डॉ.राज नगरकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. यापूर्वी ताश्कंद (कझाकिस्तान) येथे ओपीडी सुविधा सुरू आहे. तसेच बांगलादेशच्या राजदूतांनी रुग्णालयास भेट देत येथील सुविधा व रुग्णांवर होणारे यशस्वी उपचार बघता त्यांच्या देशातील रुग्णांवरही उपचार करण्याबाबत निमंत्रण दिले आहे. त्यानुसार रुग्णालयात बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी)द्वारे रुग्ण तपासणीचा व उपचारार्थ नाशिकमधील सुसज्ज रुग्णालयात उपचार करण्याचा निर्णय झाला आहे. त्यापाठोपाठ अफगाणिस्तानातील कर्करोगग्रस्तांनाही एचसीजीमध्ये उपचार सुविधेचा फायदा घेता येणार आहे.

- Advertisement -

अफगाणिस्तानात 3 लाखांहून अधिक रुग्ण

अफगाणिस्तानात तीन लाख कर्करोगग्रस्त रुग्ण आहेत.पुरुष कर्करोगग्रस्तांमध्ये मृत्यूदर ७.३ टक्के आहे. महिलांमध्ये ८.३ टक्के इतका मृत्यूदर आहे. आठवड्याला विविध २१ विमानांतून अशा रुग्णांना उपचारार्थ भारतात आणले जात असते. ७० ते ७५ टक्के कर्करोगग्रस्तांवर भारतात उपचार होत असल्याचे डॉ. खलीद अहमद यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -