घरताज्या घडामोडीसम विषम चे पालन न करणार्‍या व्यासायिकांवर गुन्हे दाखल करणार

सम विषम चे पालन न करणार्‍या व्यासायिकांवर गुन्हे दाखल करणार

Subscribe

महापालिका आयुक्तांचा इशारा : बाजारपेठांतील सर्व व्यवहार सुरू

‘मिशन बीगिन अगेन’ टप्पा दोन अंतर्गत शहरात टप्प्याटप्प्याने टाळेबंदी उठविण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानूसार शहरातील बाजारपेठा सम – विषम तारखेच्या फॉर्म्युल्यानूसार खुल्या ठेवण्याबाबत महापालिका आयुक्त आणि व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मात्र सोमवारी शहरात या नियमावलीला हरताळ फासत रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील दुकाने उघडण्यात आली. त्यामुळे या नियमावलीचे उल्लंघन करणार्‍या बाजारपेठा त्वरीत बंद करून संबधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालीका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागीय अधिकार्‍यांना दिले आहेत.

दोन महीन्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. शासनाने तीन टप्प्यांमध्ये निर्बंध शिथील करतांना बाजारपेठांमध्ये गर्दी होउ नये याकरीता सम – विषम तारखेच्या फॉर्म्युल्यानूसार दुकाने सुरू ठेवण्याबाबतचे निर्देश दिले. म्हणजे, शहर वाहतूक शाखने पी १, पी २ बाबत प्रसिध्द केलेल्या अधिसुचनेनुसार रस्त्याच्या एका बाजुची दुकाने १,३,५,७, ९ या पध्दतीने तर दुसर्‍या बाजुची दुकाने २,४,६,८,१० यानूसार सुरू ठेवण्यात येतील असे निर्देशित करण्यात आले. यासंदर्भात नाशिक शहरातील सर्व व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक महापालिका आयुक्त राधकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेत पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेनूसार ज्या भागात शहर वाहतुक शाखेने पी १, पी २ साठी अधिसुचना प्रसिध्द केली आहे तेथे हे निर्देश लागलीच लागु होतील. मात्र ज्या भागात याबाबतचे मार्किंग करण्यात आलेले नाही त्या भागात संबधित विभागीय अधिकार्‍यांसमवेत त्या भागातील व्यापार्‍यांनी चर्चा करून निर्णय घेण्याबाबत निर्देश देण्याच्या सुचना देण्यात आल्या. मात्र व्यापारी आणि प्रशासन यांच्यात समन्वय होत नसल्याने याबाबतचा संभ्रम अधिकच वाढला आहे. मात्र आता या नियमावलीचे पालन न करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराच महापालिका आयुक्तांनी विभागीय आयुक्तांना दिला.

- Advertisement -

नियम धाब्यावर
सोमवारी या नियमावलीचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. सर्व दुकाने खुली झाल्याने बाजारपेठांमध्ये नागरीकांची एकच गर्दी पहायला मिळाली. महात्मा गांधी रोड, रविवार कारंजा, सराफ बाजार, भांडी बाजार, सराफ बाजार दहीपुल परिसरात नागरीकांची गर्दी दिसून आली.सम- विषम तारखेच्या फॉर्म्युल्यानुसार एका बाजुची दुकाने बंद राहणे अपेक्षित असतांना रस्त्याच्या दोन्ही बाजुची दुकाने उघडण्यात आल्याचे दिसून आली. महापालिकेचे अधिकारी किंवा पोलीस व्हॅन दिसताच तात्पुरती दुकाने बंद करण्यात आली मात्र पथकाची पाठ फिरताच पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती दिसून आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -