घरमहाराष्ट्रनाशिकनाशिककरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार

नाशिककरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार

Subscribe

जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात २७ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा

जुलैचा पहिला आठवडा संपत आला तरीही जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे धरणांतला पाणीसाठादेखील संपुष्टात येत चाललाय. त्यामुळे जिल्ह्यातल्या अनेक गावांवर दुष्काळाचं सावट आहे. सद्यस्थितीत सहा तालुक्यांमधल्या ३६ गावं आणि २२ वाड्यांना २७ टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. जुलै उजाडूनही हवा तसा पाऊस सुरू न झाल्याने या टँकर्सला तूर्तास जुलै अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केलीय. पावसाने ओढ दिल्यानं वातावरणातला उकाडा कायम आहे. दुसरीकडे अनेक तालुक्यांत खरिपाच्या दुबार पेरणीची वेळ येऊन ठेपलीय. त्यामुळे सर्वांचंच लक्ष्य दमदार पावसाकडे लागलंय. नाशिक शहरातही नागरिकांवर पाणी टंचाईचे संकट आहे. पाणी कपाती बाबत जलसंपदा विभागाकडून महापालिकेला पत्र देखील देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -