घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकचा उच्चशिक्षित 'लखोबा लोखंडे' सायबर पोलिसांच्या जाळ्यात!

नाशिकचा उच्चशिक्षित ‘लखोबा लोखंडे’ सायबर पोलिसांच्या जाळ्यात!

Subscribe

मॅट्रिमोनियल संकेतस्थळाच्या माध्यमातून महिलांशी संपर्क साधत लग्न करुन केली फसवणूक

इंजिनिअर असलेल्या कुणाल नंदकुमार जगताप (वय ३७, रा. काठे गल्ली, नाशिक) याने एका मॅट्रिमोनियल संकेतस्थळाच्या माध्यमातून महिलांशी संपर्क करत त्यांच्यासोबत लग्न करुन फसवणूक केल्याप्रकरणी नगरच्या सायबर पोलिसांनी या उच्चशिक्षीत असलेल्या लखोबा लोखंडेला बेड्या ठोकल्या आहेत.

जगतापच्या अमिषाला बळी पडलेल्या राहाता येथील एका विवाहीतेने यासंदर्भात दिलेल्या तक्रारीवरुन सायबर पोलिसांनी १ जुलैला गुन्हा दाखल केला होता. जगताप याने या महिलेशी जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून संपर्क करत तिच्यासोबत विवाह केला होता. विवाहानंतर या महिलेला जगतापचे खरे रुप समजले आणि तो आधुनिक लखोबा लोखंडे असल्याचे समोर आले. अनेक मुलींची त्याने अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे समोर आले. त्यामुळे संबंधित महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाल्यानंतर नगरचे सायबर पोलीस आरोपीच्या मागावर होते. तो बेंगलोर येथे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नगरच्या पोलीस पथकाने बंगळुरू येथे जात त्याला बेड्या ठोकल्या. जगतापला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

- Advertisement -

३७ वर्षीय कुणाल जगताप हा इंजिनिअर असून तो नाशिकच्या काठे गल्लीतील त्रिकोणी गार्डनजवळ राहतो. बेंगलोर येथील एका कंपनीत तो नोकरीला असून विवाह नोंदणी संकेतस्थळावर स्वत:ची प्रोफाईल अपडेट करत तो अविवाहीत असल्याचे भासवित असे. एखाद्या मुलीने सर्चिंग करत त्याच्याशी संपर्क केल्यानंतर तो त्यांना लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस निरीक्षक अरुण परदेशी, उपनिरीक्षक प्रतिक कोळी, पोलीस नाईक विशाल अमृते, अभिजित अरकल, राहुल गुंडू, सम्राट गायकवाड आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -