घरमहाराष्ट्रनाशिककडाक्याच्या उन्हाळ्यातही मिळतोय गारवा; घराभोवतीची झाडे देत आहेत शीतल गारव्या सोबतच मधूर...

कडाक्याच्या उन्हाळ्यातही मिळतोय गारवा; घराभोवतीची झाडे देत आहेत शीतल गारव्या सोबतच मधूर फळे

Subscribe

राजेंद्र भांड । नाशिक

नाशिक शहर हे धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिकतेबरोबरच यंत्रनगरी म्हणूनही गेल्या 25 वर्षांपासून नाशिक शहराची वेगळी ओळख झाली आहे. लाखो भाविक, पर्यटक त्याबरोबरच औद्योगिक वसाहतींमुळे दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा यासह विविध गोष्टींनी नाशिक शहराची ओळख केवळ राज्यस्तरीय न राहता जागतिक पटलावर नाशिक शहर चमकते आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पूर्वी नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात झाडांची संख्या होती. शहराची खरी ओळखच पंचवटीपासून होती. पाच वडाचे झाड म्हणून पंचवटी नाव पडल्याची आख्यायिका आहे.

- Advertisement -

आजही परिसरात वड व पिंपळाची प्राचीन झाडे मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत. एकीकडे संपूर्ण राज्यात तापमानाचा आकडा उच्चांक गाठत आहे. सूर्य आग ओकत आहे. शहराचा पारा ४० अंशापार गेला आहे. शहराच्या अंबड, सातपूर, गोंदे परिसरात औद्योगिक वसाहती झाल्यानंतर शहराचा विस्तार वाढत गेला. पंचवटी, नाशिकरोड, सातपूर, अंबड, गंगापूर गाव, बेळगाव ढगा, मेरी, म्हसरूळ, सिन्नर फाटा, पाथर्डी फाटा, चुंचाळे, खुटवडनगर, मोरवाडी, कामटवाडा, मोटकरवाडी मुंबई नाका, द्वारका तपोवन, नांदूर नाका या परिसरात मोठ्या प्रमाणात घनदाट झाडी होती, परंतु शहराचा जसा जसा विस्तार होत गेला त्या प्रमाणात झाडे देखील कमी होत गेली. एकेकाळी नाशिक शहर थंड हवेसाठी देखील प्रसिद्ध होते. ते आता तापमानातील चढउतारामुळे उष्ण होऊ पाहत आहे.

मुंबई-नागपूर-पुणे यासह दुसर्‍या राज्यातील पर्यटक देखील नाशिकच्या वातावरणामुळे भारावून जात. २००१ पासून शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत गेला. कौलारू घरांच्या जागी सिमेंटचे बंगले आकार घेऊ लागले. तेव्हा शहरात मोजकेच बांधकाम व्यावसायिक होते. औद्योगिक वसाहतीमुळे कामगार संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती त्यामुळे कामगारांना परवडणार्‍या किंमतीत घरे बांधकाम व्यवसायिकांनी उपलब्ध करून दिली. तेव्हापासून रो हाऊस संकल्पना अस्तित्वात आली.

- Advertisement -

२००१ ते २०१३ या कालावधी घरा भोवताली मोकळी जागा मुबलक प्रमाणात असल्यामुळे परसबागेत आंबा, पेरू, आवळा, जांभूळ, केळ, बेल, रामफळ, सिताफळ यासह मोठमोठी फुलझाडे देखील घरांच्या भोवताली लावली. त्यामुळे सावली बरोबरच फळांचा देखील आस्वाद मिळत आहे. वीस वर्षांपूर्वी लावलेली झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. फणसाचे झाड सदाहरित असून १२ ते १८ मीटर उंचीचे असते. झाडाला भरपूर पाऊस, उष्ण व दमट हवामान मानवते. महाराष्ट्रात कोकणातील रत्नागिरी सिंधूदुर्गमध्ये पिकणारा फणस नाशिककरांच्या अंगणामध्ये झाडाला फळे पिकले आहेत. जळगावमध्ये पिकणारी केळी नाशिककरांच्या परसबागेत वाढताना दिसत आहेत. यासह चिकू, रामफळ, सिताफळ, जांभूळ, बेल इत्यादी झाडे फळांबरोबरच सावली देखील देत आहेत. त्यामुळे तापमान नियंत्रित राहून उन्हाच्या झळांची तीव्रता कमी होण्यास मदत होत आहे.

झाडे का महत्वाची?

झाडे जलसंधारण सुधरवतात. ऑक्सिजन बरोबरच सावली देऊन तापमान नियंत्रित ठेवतात. येत्या दहा वर्षांत शहरात बहुमजली गगनचुंबी इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. फ्लॅट संस्कृतीचा जन्म झाला व घराभोवतालची परसबाग संकल्पना नष्ट झाली. पण वीस वर्षांपूर्वीची स्लॅबची जुनी घरे अजूनही या झाडांमुळे शीतल गारव्याबरोबरच मधूर फळे देखील चाखण्याचा आनंद देत आहेत. अजूनही त्या घराभोवती चिमण्यांसह इतर पक्षांचा किलबिलाट पहाटे ऐकायला मिळतो. याच्या विरुद्ध जिथे बहुमजली इमारती उभ्या राहिल्या. तिथे आज पक्ष्यांच्या किलबिलिटा ऐवजी वाहनांचे कर्णकर्कश आवाज ऐकू येतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -