घरताज्या घडामोडीमला तु आवडते म्हणत भरस्त्यात विवाहितेचा विनयभंग

मला तु आवडते म्हणत भरस्त्यात विवाहितेचा विनयभंग

Subscribe

मला तु फार आवडते, असे म्हणत एकाने भरस्त्यात विवाहितेला अडविले. तिचे कपडे फाडत त्याने मारहाण व शिवीगाळ करत विनयभंग केल्याची घटना बुधवारी (दि.१७) सकाळी ९.३० वाजता चुंचाळे शिवार, अंबड येथे घडली. याप्रकरणी पीडित विवाहितेने अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अयुब शेख (रा. केवलपार्क, अंबड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित विवाहिता स्त्यावरुन घराच्या दिशेने पायी जात होती. भरत्यात अयुब शेख याने तिला अडविले. तु मला फार आवडते, असे म्हणत त्याने तिचे कपडे फाडत विनयभंग केला. त्यानंतर तिला शिवीगाळ व मारहाण केली. तुझ्या नवर्‍याला ठार मारुन टाकीन, तुला नाशिकमध्ये राहू देणार नाही, अशी धमकी त्याने तिला दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -