घरताज्या घडामोडीमुंबईच्या धर्तीवर मालेगावांत डॉक्टरांचे ‘टास्क फोर्स’

मुंबईच्या धर्तीवर मालेगावांत डॉक्टरांचे ‘टास्क फोर्स’

Subscribe

आरोग्यमंत्री राजेश टोपे ः संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यावर देणार भर

मालेगाव शहरात करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मुंबईच्या धर्तीवर उत्तर महाराष्ट्रातील तज्ञ डॉक्टरांचे ‘टास्क फोर्स’ तयार करण्यात येणार आहे. यामुळे करोनाविरूध्दच्या लढाईत हे डॉक्टर्स आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे मालेगावातून करोना हद्दपार करण्यासाठी आता संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यात येणार आहे, असे सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मिशन मालेगांव यशस्वी करण्याकरीता सर्व आवश्यक पाउलं उचलली जातील असे सांगितले.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत जिल्हयाचा आढावा घेण्यात आला. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. टोपे म्हणाले की, मालेगांवची एकूणच परिस्थिती लक्षात घेता सर्वेक्षण वाढवावे लागेल. याकरीता पथकांची संख्याही वाढविण्यात येईल. मालेगावाची लोकसंख्या अधिक असून दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे घरात क्वॉरंटाइन करणे शक्य नसून या भागातील लोकांना संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या ठिकाणी २०० खाटांचे हॉस्पिटल सुसज्ज करण्यात आलं आहे. या रुग्णालयात उपचाराच्या सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत. डॉक्टरांना किट्सही देण्यात येणार आहेत. या ठिकाणी डॉक्टर्स वाढवून देण्याची मागणी होती त्यानूसार डॉक्टर्सची नेमणूक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अद्यापही १० ते २० डॉक्टर कामावर हजर झालेले नाहीत, हे डॉक्टर २४ तासात कामावर न आल्यास त्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले. दरम्यान, मालेगावातील खासगी डॉक्टरांना दवाखाने सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले. खासगी डॉक्टरांना शासनाच्यावतीने पीपीई किट्स देण्यात येईल. पण त्यांनी दवाखाने सुरू करावेत. दवाखाने सुरू न केल्यास जिल्हाधिकार्‍यांमार्फत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

- Advertisement -

रिक्त जागा भरण्याचे आदेश
जिल्हयातील आरोग्य सेवेतील रिक्त जागा त्वरीत भरण्यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना अधिकार देण्यात आले आहेत. याकरीता उमेदवारांचे अर्जही मागविण्यात आले आहे. मात्र काही तांत्रिक कारणास्तव या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. मात्र राज्याच्या आयटी विभागाच्या सचिवांशी चर्चा झाली असून हे तांत्रिक दोष दूर करून लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पुर्ण करण्यात येईल असे ते म्हणाले.

प्लाझ्मा थेरपी यशस्वी
प्लाझ्मा थेरपीबाबत विविध चर्चा आहेत मात्र लिलावती रूग्णालयात पहीली प्लाझ्मा थेरपी करण्यात आली. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी याबाबत अहवाल दिला असून ही थेरपी यशस्वी झाल्याचे कळविले आहे. तसेच आज नायर रूग्णालयातही ही थेरपी यशस्वी करण्यात आली त्यामुळे तर गाईडलाईनचे तंतोतंत पालन केले तर यात कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -