घरमहाराष्ट्रनाशिकअनधिकृत उपसा रोखण्यासाठी कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडीत

अनधिकृत उपसा रोखण्यासाठी कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडीत

Subscribe

नाशिक : नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्यासाठी नागरिकांना पाणी मिळत नसताना धरणांच्या मृत साठयातून शेतीसाठी पाण्याचा अनधिकृत उपसा केला जात असल्याची बाबत आमदार सुहास कांदे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तातडीने आदेश काढून माणिकपुंज आणि नाग्यासाक्या धरण क्षेत्रातील कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे आदेश काढले आहेत.

जिल्ह्यातील 92 पैकी 44 महसुली मंडळात 21 दिवसांपासून पावसाने ओढ दिली असून ही संख्या ६० पर्यंत पोहोचणार आहे. निम्म्याहून अधिक मंडळांवर दुष्काळाच्या तीव्रतेचे संकट घोंगावत पावसाळ्याचे तीन महिने सरूनही दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यावर टंचाई संकट गडद होत चालले आहे. यापुढील काळात पाऊस झालाच नाही तर उपलब्ध पाणीसाठा जुलै 2024 पर्यंत कसा पुरवता येईल, अशी चिंता प्रशासनासमोर आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 772 मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना केवळ 380 मिमी पाऊस झाला आहे.

- Advertisement -

त्यामुळे पावसाची ही मोठी तूट निर्माण झाली आहे. काही भागांत पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्याची परिस्थिती असून जेमतेम 5-10 टक्के लोकांनी पेरणी केली होती. परंतु त्यांनाही पिके डोळ्यासमोर जळताना दिसत आहे. सध्या धरणसाठयात उपलब्ध असलेला पाणीसाठा हा फक्त पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शेती धोक्यात आली आहे. त्यातही अनेक तालुक्यांमध्ये भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी टंचाई आढावा बैठकीत नांदगाव तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला.

नाग्यासाक्या धरण कोरडेठाक पडले असून धरणाच्या मृत साठयातून अनेक शेतकर्‍यांनी मोटार टाकून अनधिकृरित्या पाणी उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले. अगोदरच शेतकरी अडचणीत असतांना त्यांच्या मोटारी जप्त न करता निदान फिडरवरील वीज पुरवठा बंद करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आदेश काढत नादंगाव तालुक्यातील माणिकपुंज, नाग्यासाक्या, कासारी क्रमांक १, कासारी क्रमांक २ वरील सर्व कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडीत करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -