घरमहाराष्ट्रनाशिककोरोनाचे कारण नको, आता विकासकामे वेळेत पूर्ण करा

कोरोनाचे कारण नको, आता विकासकामे वेळेत पूर्ण करा

Subscribe

जिल्हा नियोजन समिती बैठकीत पालकमंत्र्यांचे आदेश

कोरोनामुळं गेल्या १० महिन्यांपासनं जिल्ह्यातली विकासकामंही ठप्प झाली आहेत. मात्र, आता राज्य सरकारनं या कामांसाठी काही प्रमाणात निधी द्यायला सुरुवात केल्यानं कोरोनाचं कारण पुढे न करता विकासकामांना गती द्या, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री छगन भुजबळांनी अधिकार्‍यांना दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या शनिवारी (दि.३०) झालेल्या बैठकीत विकासकामांबाबत चर्चा झाली. त्यात ग्रामीण भागातली आरोग्य व्यवस्था बळकट करणं, वीज वितरण व्यवस्था सुधारणं, शाळेच्या वर्गांची दुरुस्ती आणि महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिलेत. या बैठकीत ७३३ कोटींचा आराखडा सादर करण्यात आला. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी ही कामं मार्गी लावून, नव्या कामांचा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -