घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक मजूर मृत्यूप्रकरणी बिल्डर गुप्ता फरार; चौघांना अटक

नाशिक मजूर मृत्यूप्रकरणी बिल्डर गुप्ता फरार; चौघांना अटक

Subscribe

मंगळवारी सकाळी गंगापूर रोड येथील अपना घर या गृहप्रकल्पाच्या बांधकाम साईटवरील पाण्याची टाकी कोसळून  चार मजूरांना आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी विधानसभेत केल्यानंतर आज अखेर चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य जबाबदार असलेला सम्राट ग्रूपचा संचालक बांधकाम व्यावसायिक सुजॉय गुप्ता फरार झाला आहे.

निष्काळजीपणाचा ठपका ठेवत आज गंगापूर रोड पोलिसांनी चार जणांना अटक केली. त्यात ठेकेदार, इंजिनियअरसह प्रकल्प व्यवस्थापकाचा समावेश आहे. ठेकेदार भावीन पटेल, इंजिनिअर आशिष सिंग यांच्यासह प्रकल्प अधिकारी सचिन शेवडे व नारायण कडलग या चार जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र सुजॉय गुप्ता फरार झाला.

- Advertisement -

नाशिकमधील बिल्डर सुजॉय गुप्ता यांच्या सम्राट ग्रुपकडून अपना घर हा मोठा गृहप्रकल्प उभारला जातो आहे. या ठिकाणी मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल येथील काही व्यक्ती बांधकाम मजूर म्हणून काम करत आहेत. मजुर सहकुटुंब राहत असल्याने त्यांच्यासाठी प्रकल्पाच्या ठिकाणी १० ते १५ फुट उंचीची सिमेंटची पाण्याची टाकी बांधलेली होती. मंगळवारी सकाळच्या सुमारास काही मजुर आंघोळीसह कपडे धुण्यासाठी टाकीखाली थांबलेले असतानाच, ही टाकी अचानक कोसळली. त्याखाली दबून तीन मजूर जागीच ठार झाले. तर, अन्य दोघा गंभीर जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला.

000000000000000000

- Advertisement -

मजुरांकडून याबाबत तक्रारी होत्या मात्र याबाबत सदरच्या बिल्डरने निष्काळजी केल्याचे दिसते.याप्रकरणी ३०४ अ कि ३०४ (२) सदोष मनुष्यवधाचा किंवा मृत्यूला जबाबदार गुन्हा दाखल करायचा का याचा निर्णय स्ट्रक्चरल ऑडिट नन्तर घेणार. – पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील

बिल्डरबाबत पोलिसांचा सॉफ्ट कॉर्नर?

पुण्यातील कोंढवा दुघर्टनेप्रमाणे बिल्डरवर गुन्हा नोंदविण्यात येऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र नाशिकला काल दुर्घटना घडल्यानंतरही पोलिस आयुक्त नांगरे पाटील हे आढावा घेऊन, स्ट्रक्चरल ऑडिट करून गुन्हा दाखल करू असे सांगत होते. या प्रकरणात संबंधित बिल्डर प्रथमदर्शनी दोषी असतानाही त्यांनी बिल्डरवर उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र जेव्हा हे प्रकरण विधानसभेत पोचले, तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर गुन्हा नोंदविला गेला. या सर्व प्रकरणात नाशिक पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली. त्यांनी बिल्डरला सॉफ्ट कॉर्नर दिल्यानेच तो पळून जाण्यात यशस्वी झाला का? अशी चर्चा आता होत आहे.

नाशिकचं ‘अपना घर’ एका क्षणात पोरकं करून गेलं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -