घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआजपासून गणेश विसर्जनापर्यंत रात्री १२ पर्यंत 'आवाज निर्बंधमुक्त'

आजपासून गणेश विसर्जनापर्यंत रात्री १२ पर्यंत ‘आवाज निर्बंधमुक्त’

Subscribe

नाशिक : यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांना सोमवार (दि.५) ते शुक्रवार (दि.९) असे सलग पाच दिवस मध्यरात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक लावण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. याशिवाय नवरात्रोत्सवात दोन दिवस तर दिवाळी, ईद-ए-मिलाद, ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर या दिवशीही रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपकांना परवानगी असल्याचे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी काढले. या आदेशांमुळे ध्वनिक्षेपकांना परवानगी मिळाली असली तरीही डीजेवरील बंदी मात्र कायम राहणार आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशान्वये ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक आदींच्या वापराबाबत सूट जाहीर करण्याकरिता जिल्हास्तरावर निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाद्वारे प्राधिकृत केले आहे. यानुसार जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या वर्षात जिल्ह्यातील दहा प्रमुख उत्सवांसाठी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी ६ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत लाउडस्पिकर्स वाजवण्याची मुभा देण्यात आली असल्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी १ जानेवारीला काढले होते.

- Advertisement -

या आदेशानुसार गणेशोत्सव काळात केवळ ८ व ९ सप्टेंबर असे दोन दिवसच रात्री १२ वाजेपर्यन्त ध्वनिक्षेपक वाजवण्यास परवानगी देण्यात आली होती. गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी अजून दोन ते तीन दिवस वाढीव परवानगी द्यावी, अशी मागणी पोलिस आयुक्तांसह जिल्हा प्रशासनाकडे होत होती. त्यानुसार आता जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करत अधिकचे तीन दिवस ध्वनिक्षेपक रात्री १२ पर्यंत वाजवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता शहरासह जिल्ह्यात पाच दिवस वाजवा रे वाजवा असणार आहे.

आवाजाची मर्यादा पाळावी लागणार

जिल्हाधिकार्‍यांच्या सुधारित आदेशानुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर ऑडिटोरियम, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागांव्यतिरिक्त इतर ठिकाणी करण्यासाठी ध्वनीची विहित मर्यादा ठेवून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -