ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे वाजले बिगुल

३१ ऑगस्टला मतदान : ३ सप्टेंबरला मतमोजणी

Grampanchayat election

विधानसभा निवडणुकीपूर्वी आता गावकीचे राजकारण पेटणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नाशिक जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी ३१ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून ३ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

९ ते १६ ऑगस्ट या कालावधीत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. १९ ऑगस्टला अर्ज छाननी केली जाईल. २१ ऑगस्टपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. दुपारी ३ नंतर निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्ह वाटप केले जाईल. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजता मतदान पार पडेल. ३ सप्टेंबरला २५ ग्रामपंचायतींची मतमोजणी केली जाणार आहे.

या आहेत ग्रामपंचायती

तालुका   ग्रामपंचायत

  • नाशिक : शिवणगाव, गौळाणे, संसरी
  • येवला : निळखेडे, दुगलगाव, पांजरवाडी, जउळके
  • मालेगाव : पळासदरे, सातमाने, लुल्ले, पोहाणे, दुधे
  • निफाड : धारणगाव खडक
  • बागलाण : वायगाव, कपालेश्वर, तुंगणदिगर, पिंपळवाडे, भिलवाड व खामलोण