घरमहाराष्ट्रनाशिककसारा घाटात मालगाडी रूळावरून घसरली; वाहतूक ठप्प

कसारा घाटात मालगाडी रूळावरून घसरली; वाहतूक ठप्प

Subscribe

अपघाताची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळताच मालगाडीचे चाक रुळावर आणण्यासाठी रेल्वे दुर्घटना सहाय्यता गाडीतील कर्मचार्यांचे भर पावसात युद्धपातळीवर प्रयत्न

 कसारा घाटातील जव्हार फाट्याजवळ रेल्वे मालगाडीच्या एका डब्याचे चाक रुळावरून घसरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुबंईहुन येणारी मालगाडी कसारा घाट पार करत असतांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घाटातील जव्हार फाट्याजवळ टीजीआर 3 या पोलजवळ मालगाडीच्या डब्याचे चाक रुळावरुन घसरल्याने मुंबईकडे जाणारी डाऊन मार्गाची वाहतूक टप्प झाली होती. या अपघाताची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळताच मालगाडीचे चाक रुळावर आणण्यासाठी रेल्वे दुर्घटना सहाय्यता गाडीतील कर्मचारी यांनी भर पावसात युद्धपातळीवर काम चालू होते. मात्र मुबंईहुन येणार्‍या मेल व एक्सप्रेस या रेल्वे गाड्या दुसर्‍या लाईनवर वळविण्यात आल्याने दोन तासाच्यावर रेल्वे वाहतुकीवर काही परिणाम झाला नाही. त्यासाठी दुसर्‍या रेल्वे लाईन वरून गाड्या वळवण्यात आल्या असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -