घरमहाराष्ट्रनाशिकडेंटिस्टचे सामाजिक भान; लायन्स स्टारच्या माध्यमातून शाळेला ग्रंथालय भेट

डेंटिस्टचे सामाजिक भान; लायन्स स्टारच्या माध्यमातून शाळेला ग्रंथालय भेट

Subscribe

एमजीव्ही डायनामाइटने संकलित केली वर्गणी; लायन्सच्या माध्यमातून पुस्तके, स्टिलचे कपाट, वह्या, पेन्सिल, रंगपेट्या, क्रीडा साहित्याचे नागलवाडी शाळेत वाटप

माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलने म्हटली की त्यात गप्पा-टप्पा, जुन्या आठवणी आणि भरपूर मनोरंज या बाबींवर भर दिला जातो. पण या गोष्टींबरोबरच सामाजिक दायित्वाची जाणीव ठेऊन महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेतील दंत महाविद्यालयाच्या १९९९ च्या बॅचने वर्गणी जमा केली. लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टारच्या माध्यामातून या वर्गणीचा सदोपयोग करीत गिरणारे परिसरातील नागलवाडी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय भेट, तसेच शालेय आणि क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले.
सर्विस विथ सेलेब्रशन उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी ‘एमजीव्ही डायनामाइट’ नावाचा ग्रुप करुन त्या माध्यमातून समाजाचे आपण काही देणे लागतो असा विचार व्यक्त केला. हा विचार व्यक्त झाला आणि काही काळातच या माजी विद्यार्थ्यांनी वर्गणी जमा केली. जमा केलेल्या वर्गणीतून काही रक्कम त्यांची वर्गमैत्रिण आणि लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टारच्या सचिव डॉ. नुपुरा प्रभू यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानुसार संस्थेने गिरणारे जवळील नागलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी आणि क्रीडा साहित्याचे वितरण केले. सुमारे ५०० विविध विषयांची, गोष्टीची,शैक्षणिक, वैज्ञानिक इ पुस्तके, त्या साठी लागणारे स्टील कपाट, १५०वह्या, १५० पेन्सील, ७५ चित्रकला, ७५ रंगपेट्या तसेच खेळण्यासाठी क्रीडा साहित्य देण्यात आले. क्लबच्या सचिव डॉ. नुपुरा प्रभू यांनी पृथ्वीची प्रतिकृती तसेच नितीन मराठे यांनी घड्याळ देऊन मुलांचे भौगोलिक ज्ञान आणि वेळेच्या नियोजनाची पूर्तता केली. याच वेळेस मन्मय अमित प्रभू याचा वाढदिवस शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला. शेवटी विद्यार्थ्यासह सर्व उपस्थितांना भरपेट नाश्ता, शीतपेय, केक आणि चॉकलेट्स देण्यात आली.

- Advertisement -


शिक्षिका शर्मिला बच्छाव यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी डॉ. किशोर मुळे, डॉ. रेवती मुळे, डॉ. विक्रम पवार, डॉ. नरेंद्र गुप्ता,डॉ. अमोल सरोदे यांचे सहकार्य लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका चौधरी, मदतनीस प्रियांका पोटींदे, नागलवाडीचे सरपंच भास्कर मराडे, केंद्रप्रमुख निकम, धोंडीराम पोटींदे, लक्ष्मण पोटींदे यांच्यासह उपक्रमाचे प्रमुख जयंत येवला, क्षेत्रीय अधिकारी तथा सनदी लेखापाल राम डावरे, लायन्स क्लब ऑफ नासिक स्टार च्या अध्यक्षा नीलिमा डावरे, सचिव डॉ.नुपुरा प्रभू, खजिनदार सारिका कलंत्री, नितीन मराठे, डॉ अमित प्रभू, अभय बाग, अश्विनी बाग, मीरा मराठे, शिल्पा मराठे, मनीषा लढ्ढा, ललिता प्रभू, तन्वी प्रभू ,हितेश वाघेला आदी उपस्थित होते.

डेंटिस्टचे सामाजिक भान; लायन्स स्टारच्या माध्यमातून शाळेला ग्रंथालय भेट
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -