घरमहाराष्ट्रनाशिकसव्वा दोन लाखांचा अवैध दारूसाठा जप्त

सव्वा दोन लाखांचा अवैध दारूसाठा जप्त

Subscribe

सुरगण्यातील फनसपाडा येथे राज्य उत्पादन शुल्क पथकाने केली कारवाई

रंगतविहीर शिवार, फनसपाडा (ता.सुरगाणा) येथे अवैध देशी, विदेशी दारूसाठा असल्याची माहिती शनिवारी (ता.२०) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकास मिळाली. पथकाने या ठिकाणी छापा टाकत रॉयल स्टॅग व्हिस्की १८० मि.ली. ३३६ सीलबंद काचेच्या बाटल्यांचे सात बॉक्स, इंपेरीअल ब्ल्यू व्हिस्की १८० मि.ली. २८८ सीलबंद काचेच्या बाटल्यांचे ६ बॉक्स, देशी दारू १८० मि.ली. २४०० सीलबंद काचेच्या बाटल्यांचे ५० बॉक्स असा एकूण २ लाख २८ हजार ९६० रूपयांचा दारूसाठा जप्त केला. संशयित हरीदास सोनिराम चौधरी हा फरार झाला. त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई प्रभारी निरीक्षक देवदत्त पोटे, एस. एस. रावते, दीपक आव्हाड, विठ्ठल हाके, लोकेश गायकवाड यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -